
दैनिक चालु वार्ता
म्हसावद सर्कल प्रतिनिधी
सुनिल पाटिल
म्हसावद :- करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाच्या आदेशानुसार म्हसावद ता . शहादा गावाची श्री रिद्धी सिद्धि विनायक यात्रा रद्द करण्यात आल्याचे म्हसावद ग्रामपंचायत प्रशासनाने कळवले आहे करोना मुळे सलग तिसऱ्या वर्षीही म्हसावद येथे भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे.
आज संकष्ट चतुर्थी पासून म्हसावद येथे भरणारी श्री रिद्धी सिध्दी विनायक यात्रा न भरण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनातर्फे प्रांताधिकारी , तहसीलदार , म्हसावद पोलीस स्टेशन ला लेखी निवेदन देण्यात आली आहेत . गावात दवंडी देऊन यात्रा बंद असल्याचे जाहीर करण्यात आले आहे .
सरपंच सौ . आक्काबाई ठाकरे , उपसरपंच श्री चिंतामण धनगर , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामविकास अधिकारी श्री बी.पी. गिरासे यांनी संकट चतुर्थी निमित्ताने येणाऱ्या भाविकांना करोना बाबत दक्षता घेऊन नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे .