
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय भंडाराज यांना प्रहार युवा संघटनेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेतील ड क्रमांकाच्या यादी करीता मंजुरी देण्यात यावी.या यादी मद्धे प्रथम प्राधान्य अपंग,विधवा,SC,NT या प्रवर्गातील लोकांना देण्यात यावे व पूर्व वर्गवारी ड क्रमांकाची यादी तयार करण्यात यावी. अशी मागणी प्रहार युवा संघटना व स्थानिक नागरिकांनी श्री.राजू चोखंडे ग्रामसेवक यांना निवेदनामार्फत करण्यात आली.
निवेदन देतेवेळी निलेश चोपडे प्रहार युवा तालुका प्रमुख,शाखा प्रमुख विजय मुकुरने,अनिकेत चऱ्हाटे,गोलू मसाने, ऋषिकेश बोटोये,अक्षय चिकटे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान आवास योजना अर्थसहाय्य-ग्रामीण
सन २०१६-१७ पासून पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात आहे. घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रू.१.२० लक्ष व नक्षलग्रस्त भागाकरिता रू.१.३० लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येते होते परंतु नवीन नियमाप्रमाणे शासन नियमावलीच्या अर्थसहाय्य मद्धे सुधारित करण्यात आलेले आहे.
पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण योजनेचे अर्थसहाय राज्यस्तरावरील बँक खात्यातून PFMS प्रणालीव्दारे लाभार्थ्यांच्या बँक/पोस्ट खात्यात जमा होते. पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण,२०११ मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडीकरिता वापरण्यात येणार येते. पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक सहाय्य पुरविण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सहाय्य संस्था गठीत आहे.
घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ९०/९५ दिवसांच्या अकुशल मुजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण व अन्य ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण आहे.