
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लोहा शहरातील जोशी मंगल कार्यालयामध्ये कोरोना नियमांचे पालन करत उन्हाळी संभाव्य पाणी पुरवठा आढावा बैठक संपन्न झाली, या वेळी बैठकीस सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शामसुंदर शिंदे,उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसिलदार व्यंकटेश मुंडे ,जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्याम आण्णा पवार, युवा नेते रोहित पाटील शिंदे, गटविकास अधिकारी वावळे ,उपविभागीय अभियंता दवंडे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुजलवाड, गट शिक्षण अधिकारी रवींद्र सोनटक्के, पाणीपुरवठ्याचे उपमुख्य कार्यकारी अभियंता बी .एम .शिंदे,एस.एस.डिकळे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी चेटलावार, सभापती आनंद शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड,सह प्रमुख अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी लोहा तालुक्यातील ९४ गावातील सरपंच, ग्रामसेवक यांनी दि. १ जानेवारी २०२२ ते दि.३० जून २०२२ या कालावधीत तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतचा उन्हाळी पाणीटंचाई कृती आराखड्यात संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ विविध बाबींची मागणी केली.यामध्ये ग्रामपंचायत निहाय वाडी, तांडे, वस्त्यांसाठी,व दलित वस्तीसाठी विंधन विहिरी, पाईपलाईन, विहिरीतील गाळ काढणे, नवीन बोरवेल घेणे, , नवीन विंधन विहिरीचे प्रस्ताव, नवीन पाणी टाकी बांधकामाच्या संदर्भात तील मागणी उपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांनी या बैठकीत केली, या संभाव्य पाणी टंचाई आढावा बैठकीत संबोधित करताना लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे म्हणाले,”की मतदार संघातील व लोहा तालुक्यातील ९४ गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ बसणार नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी व तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणार असणाऱ्या गावांसाठी तात्काळ उपाययोजना करून ग्रामपंचायत निहाय नागरिकांना उन्हाळ्यात सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन नियोजन करावे.
संबंधित अधिकाऱ्यांनी उन्हाळी पाणीपुरवठा संदर्भात निष्काळजीपणा केला तर तो कदापि खपवून घेणार नसल्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीत बोलताना स्पष्ट केले.यावेळी बोरगावचे सरपंच पुंडलीक पाटील बोरगावकर,शेकाप जिल्हाध्यक्ष योगेश पाटील नंदनवनकर, कापसी चे माजी सरपंच राजू पाटील कापसीकर, हरबळ चे सरपंच अवधूत पाटील, सरपंच पंजाब पाटील माळेगावे, खरेदी विक्री संघाचे संचालक सुधाकर सातपुते, डोणवाडा चे सरपंच हनुमंत पाटील जाधव, सरपंच सखाराम पाटील लोंढे, बालाजी इसादकर, गिरीश डिगोळे, अवधूत पेठकर, संतोष मुकनर, सिद्धू पाटील वडजे सह तालुक्यातील सरपंच ,ग्रामसेवक पत्रकार, पदाधिकारी कोरोना नियमांचे पालन करत उपस्थित होते.