
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
पारनेर :- पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार (नेते) निलेश लंके यांनी पारनेर नगर पंचायत निवडणुकीत बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे.त्यामुळे कुठल्या तरी चमत्कारिक घडामोडींची शक्यता आमदार साहेबांनी ठेवली नाही.पारनेर शहर विकास आघाडी च्या दोन्ही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.राष्ट्रवादिचे सात आणि शहर विकास आघाडीचे दोन अशा ९नगरसेवकांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांच्याकडे गटनोंदणी केली.यावेळी गटनेता म्हणून विजय सदाशिव औटी व उपगटनेता म्हणून सुरेखा अर्जुन भालेकर यांची निवड करण्यात आली.
अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.यावेळी अर्जुन भालेकर, बाळासाहेब नगरे, बाळासाहेब मते,बबन चौरे, राहुल झावरे, कारभारी पोटघन, संदिप चौधरी, बाळासाहेब लंके, सचिन औटी, डॉ.बाळासाहेब कावरे, अशोक घोडके, महेंद्र गायकवाड, यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक सुरेखा भालेकर, भूषण शेलार,निता विजय औटी, नितीन अडसूळ, विजय सदाशिव औटी, सुप्रिया सुभाष शिंदे, हिमानी बाळासाहेब नगरे, डॉ.विद्या कावरे, प्रियांका औटी हे उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ११च्या नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा भालेकर तसेच भूषण उत्तम शेलार यांनी आमदार निलेश लंके यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला.
पारनेर शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण दुसरी कुठलीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देणार असल्याचे सुरेखा भालेकर व भूषण शेलार यांनी सांगितले.यावेळी आमदार निलेश लंके साहेबांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.