
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनी 25 जानेवारीस मतदार दिन साजरा करतात.या वर्षी कोरोना काळात कंधार तहसील कार्यालयाच्या वतीने श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेच्या मातृशाळेत प्रबोधनात्मक आकाश कंदिल आणि भित्तिपत्रक स्पर्धा 20 जानेवारीस 11 वाजता आयोजित केली होती.या स्पर्धेच्या उद्धघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे उप विभागीय अधिकारी आदरणीय मंडलिक साहेब व कंधारचे तहसीलदार आदरणीय कामठेकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच तहसील कार्यालयातील कामात अग्रेसर आदरणीय मन्मथ थोटे सर उपस्थित होते.प्रथम “अतिथी देवो भव “उक्ती प्रमाणे मुख्याध्यापक आदरणीय सदाशिव आंबटवाड सर, उपमुख्याध्यापक डी.पी.कदम सर,पर्यवेक्षक रमाकांत बडे सर व तुकाराम कारागीर सर यांनी उपविभागीय अधिकारी आदरणीय मंडलिक साहेब व तहसीलदार आदरणीय कामठेकर साहेब यांचे पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेच्या उद्धघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना,मतदार लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ असतो.नविन होणारे मतदार या विद्यार्थी दशेतून निर्माण होतो.
आकाश कंदिल व भित्तिपत्रके या स्पर्धेतील विद्यार्थी सुरेख तयार करत आहेत. असे मार्गदर्शन करतांना गौरवोद्गार काढले.शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करुन त्यांचे आभार मानले. या स्पर्धेचे आयोजन दत्तात्रय एमेकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी कु.श्रृती एमेकर, कु.शुभांगी केंद्रे,कु. श्रिया सुकणे, कु.शारदा कोटाळे, कु.ऐश्वर्या मंगनाळे, कु.आर्या राठोडकर, कु.शुभदा मुसळे, कु.प्रतिक्षा पानपट्टी,कु.नंदीनी व्यास,कु.सुवर्णा केंद्रे,कु श्रेया एमेकर, सिध्देश्वर केंद्रे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सहभाग घेतला.
ही स्पर्धा घेतांना कलाध्यापिका धोंडगे मॅडम, चिंतेवार मॅडम, सिरसे मॅडम, वडजे मॅडम यांनी पर्यवेक्षिकांच्या भुमिकेत होत्या. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन प्रा.सदानंदजी कांबळे सर यांनी केले. या प्रसंगी प्रा.शेट्टे सर,प्रा.वरपडे सर, प्रा.संभाजी वडजे सर,प्रा.लक्ष्मण अक्कनगीरे सर,प्रा.बामणे सर,प्रा.बेग सर प्राध्यापिका पवार मॅडम, प्राध्यापिका डांगे मॅडम उमाकांत चिवडे सर, सुरेश घोरबांड सर, खुडे सर,अझर बेग सर,गुलाम मामु, ऊल्हास राठोड, चंद्रकांत मोरे आदीजण उपस्थित होते.
श्री शिवाजी हायस्कूल कंधार