
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
पोलीस बॉईज असोसिएशन ही एक महाराष्ट्रातील अ राजकीय सामाजिक संघटना आहे यातून पोलीस भरतीत पोलिसांच्या पाल्यांना ५ टक्के आरक्षण मिळून देणारी एकमेव संघटना आहे पोलीस कुटुंब व सर्व क्षेत्रातील च्या कार्यात संघटना अग्रेसर आहे. या संघटनेच्या 24 तास दक्ष दिनदर्शिकेचे लोकार्पण आज शुक्रवार रोजी महाराष्ट्र राज्याचे मंत्री रोजगार हमी योजना व फलोत्पादन कॅबिनेट मा.श्री.संदिपान भुमरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रविभाऊ वैद्य, मागरदर्शक छबुराव ताके युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष रवि अंभोरे शिवसेना तालुका प्रमुख कृष्णा पवार, सचिन ठाकूर भाऊसाहेब भावराव तांबे, नानेगाव चे पोलिस पाटील संतोष बोधणे,पोलिस बाॅईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य पैठण तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील तांबे सतिश पाटील, गोरख जैस्वाल, , सखाराम भोजने, योगेश माऊली सुरळकर, प्रमोद खाडे ,बाळकृष्ण शेवंते , सागर बनसोडे अमित लोंढे शंतनू देशमुख, अनिल राजे जाधव, तसेच संघटनेचे पदधाकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती…यावेळी मंत्री संदीपान पाटील भुमरे साहेब यांनी असोसिएशन च्या कार्याचे कौतुक करून असोसिएशन च्या कार्याला शुभेच्छा दिल्या..