
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
नांदेड :- नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्था,महाराष्ट्र शाखा नांदेड च्या वतीने नामदेव महाराज मठ संस्थान बारूळ येथे दि,20/1/2022, रोजी संस्थेच्या दिनदर्शिका 2022 प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. वर्ष 11वे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प.पूज्य.संत.श्री.नामदेव महाराज मठाधिपती, नामदेव महाराज मठ संस्थान बारूळ, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने मारोती पाटील मजरे अध्यक्ष महादेव मंदिर संस्थान बारूळ नारायणराव जाधव सर(बाबा) इंग्रजी विज्ञानाचे गाढे अभ्यासक, नानाराव पाटील कदम मंगलसांगवीकर माजी अभियंता व सामाजिक कार्यकर्ते,अनिल वट्टमवार प्राचार्य श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारूळ, डॉ.उत्तमराव बोधेमवाड पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना बारूळ,शिवाजी पाटील वळसंगवाडीकर प्रतिनिधी दै. देशोन्नती भारतीय ऑल विमा महामंडळ बारूळ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव पाटील नंदनवनकर,यांनी त्यांच्या प्रस्तावनेतून नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्थेची स्थापना 15 ऑगस्ट 2007 ला करण्यात आली असे सांगितले .
सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनाथांना मदत असेल गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असेल गरजू रुग्णांना मदत असेल वृक्षारोपण असेल संस्थेच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येतात असे सांगितले दिनदर्शिका काढण्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र त असलेले मंडळी आहेत व्यवसायिक बिझनेस मॅन सामाजिक राजकीय मंडळी या सगळ्यांनी या नावाखाली एकत्रित यावे आणि सामाजिक संस्थेचे नाव सगळ्यांच्या मनात रहाव या संकल्पनेतून ही सामाजिक संस्थेची दिनदर्शिका काढण्यात आली आहे तसेच प्रमुख पाहुणे नारायणराव जाधव सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती केशव पाटील नंदनवनकर यांनी सामाजिक कार्य फार चांगल्या पद्धतीने करतात आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे म्हटले आहे नानाराव पाटील कदम मंगलसांगवीकर यांनी सामाजिक संस्थेत प्रवेश केलेला आहे.
अनिल वट्टमवार प्राचार्य यांनी संस्थेच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं आणि वृक्षा लागवड आमच्या हाताने औरंगाबादला करण्यात आली असं मोठ्या अभिमानाने सांगितल तसेच परमपूज्य नामदेव महाराज यांनी अध्यक्ष रुपी भाषण नाम धून सामाजिक काम करत असताना खूप चटके सहन करावे लागणार आहेत सामाजिक कार्याचा तुम्ही घेतलेला वसा हा संघर्ष आहे समाजात कार्य करत असताना कोण नाव ठेवेल सांगता येणार नाही पण तुम्ही त्या बोलल्या कडे न लक्ष देता असंच समाज समाज कार्य तुमचं चालू ठेवावं आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आम्ही तुमच्या चांगल्या कार्यासाठी सोबत आहोत असे मार्गदर्शन संस्थेला केले
यावेळी उपस्थित मान्यवर मधुकर शिंदे सर, मल्हारी डोंमपले, डी. जी.जाधव छावा क्रांतिवीर सेना तालुका अध्यक्ष कंधार, बालाजी पाटील जाधव,साहेबराव भागानगरे,सुनील भागानगरे,लक्ष्मण पाटील जाधव, विनायक पाटील जाधव,ईरबा पाटील हुंबाड ,मोहनराव भागानगरे,ज्ञानेश्वर लाळे,मारोतराव जाधव,सुधाकरराव जाधव,प्रवीण भागानगरे,दिगंबर साखरे,माधव कुलकुलवाड( एल,आय,सी, विमा प्रतिनिधी,) सर्व उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजक श्याम पाटील जाधव तालुका अध्यक्ष नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्था
संयोजक अहमद सय्यद,पांडुरंग खांदाजे मठ संस्थानातील सर्व तरुण बांधव यांनी नियोजन केले.