
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार :- जव्हार नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत पुरूषोत्तम पटेल हे त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी दिनांक २१ जानेवारी २०२२ ते ७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत रजेवर जात असल्याने दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी त्यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार जव्हार नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा पद्मा गणेश रजपूत यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट,शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रफुल पवार,शिवसेना जव्हार तालुका प्रमुख श्रावण खरपडे,शहरप्रमुख परेश पटेल,माजी नगरसेवक विजय घोलप आदी.शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यानंतर पद्मा रजपूत म्हणाल्या की,नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी माझ्यावर विश्वास टाकून नगराध्यक्ष पदाची सूत्र पंधरा दिवसासाठी माझ्या कडे दिली आहेत त्यांचा विश्वास सार्थ करून जनतेला अपेक्षित असलेली कामे माझ्या हातून या कालावधीत घडतील याची मी ग्वाही देते.
तसेच एका बेलदार भटका समाजातील स्त्रीला शिवसेनेमुळेच नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे.हे केवळ शिवसेनेतच होवु शकते असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.यावेळी ग्रामस्थांतर्फे तसेच बेलदार समाजाच्या वतीने पद्मा रजपूत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला