
दैनिक चालु वार्ता
लोहा (ता.प्र.) लोहा येथुन जवळच असलेल्या मौ.कारेगाव येथील मागासवर्गिय वृध्द 82 वर्षीय महीला शेतकरी श्रीमती चऊत्राबाई व्यंकटी गायकवाड यांचे शेत गट क्र.337 मधिल 82 आर शेत जमीणीला पाटबंधारे विभाग नांदेड हे दोन वर्षापासुन शेतीला पाणी पुरवठा करण्यास टाळाटाळ करत होते.म्हनुण आंबेडकर नॅशनल काॅंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिलदादा गायकवाड यांनी जिल्हाधिका-यांना सदर महीलेच्या शेतीला गेल्या दोन वर्षापासुन पाणी पुरवठा करण्यात येत नाही आणी पाटबंधारे विभाग नांदेड पाणी पुरवठा का करत नाही ?
याचा जाब विचारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि.25/1/2022 रोजी तिवृ रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा अनिलदादा गायकवाड यांनी दिला असता श्रीमती चऊत्राबाई व्यंकटी गायकवाड यांच्या गट क्र.337 ला नियमाप्रमाणे सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे अखेर जिल्हाधीकारी कार्यालयाने लेखी आदेश काढले त्यामुळे मागासवर्गिय वृध्द महीला शेतकरी श्रीमती चऊत्राबाई गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आभार मानले.