
दैनिक चालु वार्ता
चांडोळ सर्कल प्रतिनिधी
सय्यद सलमान
चांडोळ :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेत चांडोळ येथील मुलींनी बाजी मारली असून पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत जि. प. उर्दू शाळेची रुमेसा शेख मोईन आणि मसर्र्त अहेमद खान या दोन विध्यार्थीनी पात्र ठरल्या. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आमेना फिरदोस मो. एराज व जुबेरिया मो. गफूर यांनी यश संपादन केले आहे.
मात्र कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट ओमायक्रानमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शाळेत विध्यार्थ्याना त्याच्या यशाच्या आनंद इतर विध्यार्थी व नातेवाईकांसह साजरा करता आला नसल्याची खंत विध्यार्थीनी व्यक्त केली. शिक्षकांनी सुद्धा उत्तीर्ण तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या विध्यार्थीची माहिती फोन वरून पालकांना दिली.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत सर्व उत्तीर्ण विध्यार्थीनीं नी आपल्या यशा चे श्रय आई -वडीलाना. शाळेचे मुख्यधद्यापाक व शिक्षकांना दिले. तसेच गावाचे ग्रामपंचायत सदस्य पती सय्यद कलीम यांनी सर्व शिक्षका चे कवतुक केले व आभार मानले. हे सर्व चांगल्या शिक्षणा मुळेच होऊ शकले आहे. सर्व शाळेला असेच शिक्षकांची गरज आहे असं गावकऱयांनी सांगितले आहे.