
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई :- जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. जी हाळीकर वैद्यकिय रजेवर गेल्याने उपअभियंता पी. बी. जोगदंड यांच्याकडे बांधकाम १ चा पदभार सोपविण्यात आला आहे. तर बांधकाम २ ला उपअभियंता एस. डी. चांदवडकर यांना पदभार देण्यात आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. जी. हाळीकर यांनी बील काढण्यासाठी पैसे घेतल्याची क्लिप व्हायरल झाली होती. त्याबाबत एक तक्रारही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे.
दरम्यान हाळीकर हे अजारी असून ते १९ रोजी वैद्यकिय रजेवर गेलेले आहेत. याच बरोबर ते दि. ३१ जानेवारी रोजी नियम वयोमानानुसार दि. ३१ रोजी शासन सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. यामुळे बांधकाम १ या उपविभगाचा पदभार उपअभियंता पी. बी. जोगदंड यांना देण्यात आलेला आहे. जोगदंड हे बीड तालुक्यातील असल्याने जिल्ह्याचा त्यांचा मोठा अभ्यास आहे शिवाय याठिकाणी त्यांना कामाचा अनुभवही आहे.