
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- देगलूर बिलोली पोट निवडणूक झाली व विधानसभेचे नवनिर्मित आमदार जितेश अंतापूरकर आमदारकीचा पदभार सांभाळला सांभाळल्या देगलूर व बिलोली मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नासाठी मंत्रालयामध्ये जाऊन देगलूर बिलोली मतदारसंघा मधील अडीअडचणी सांगून त्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. काल जितेश अंतापूरकर यांनी
मुंबई येथे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.श्री विजयजी वडेट्टीवार साहेब यांची भेट घेऊन तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत देगलुर बिलोली मतदारसंघासाठी निधी उपलब्ध करून देण्या बाबत पत्र देऊन चर्चा केली.