
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर :- गंगापुर तालुक्यातील कसाबखेडा फाटा ते रंगारी देवगाव गेल्या ३५ वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्ता
पावसाळ्यात अत्यंत खराब झालेल्या रस्त्याने औरंगाबाद जिल्हाचे खासदार इम्तियाज जलील जात असतांना पिंपळगाव दिवशी चे उपसरपंच ज्ञानेश्वर वर्णे व शिवसेना उपशाखा प्रमुख पंकज नन्नवरे यांनी रस्त्याच्या झालेल्या दुर्लक्षाबाबत मागणी केली होती, तेव्हा इम्तियाज जलील यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना पावसाळ्यानंतर कामाला सुरूवात होईल असे आश्वासन दिले होते.
तत्पूर्वी कन्नड चे मा आ.हर्षवर्धन जाधव यांनी व इंजी महेशभाई गुजर यांनी देवगाव रंगारी ते कसाबखेडा फाटा रस्त्याची नुसती डागडुजी न करता नव्याने रस्ता करण्यात यावा असा राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे सततचा पाठपुरावा केला होता. तेव्हा मुख्य कार्यकारी अभियंता यांनी दहेगाव- देवगाव- पाचपिरवाडी फाटा २०० कोटी रूपये मंजुरी दिली,असुन लवकरच काम सुरू होईल असे लिखीत पञ दिले होते.
त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग अधिकारी ,उप अभियंता वाजीद शेख यांनी शब्द पाळल्यामुळे तसेच रस्त्याच्या दुर्देशे बाबत वेळोवेळी वर्तमान पञात प्रसिद्ध देणार्या पत्रकारांचे परिसरातील नागरिकांच्या वतीने इंजी महेशभाई गुजर, प्रकाश नन्नवरे, विशाल पोपळघट, पिंटु मामा मोगल, पंकज नन्नवरे, चंदीले यांनी आभार मानले.