
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा : – शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय , बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोहा येथे भव्य रक्तदान शिबिर व सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोहा येथे कोरोनाचे नियम पाळुन रक्तदान शिबिर व शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.रोहिदासजी चव्हाण , कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक श्री आनंदराव बोंडारकर शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड , या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून , मा मुक्तेश्वर भाऊ धोंडगे , गणेश कुंठेवार , नवनाथ बापु चव्हाण , सुरेश पा हिलाल , मिलिंद पा पवार , संभाजी पा चव्हाण , मारोती पा बोरगांवकर , चंद्रकांत पा आडगांवकर , धनंजय पा बोरगांवकर , गजानन पवार , गजानन गुंन्ठे , यांची प्रमुख उपस्थिती राहणार असुन सदरील कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पा कऱ्हाळे यांनी केले आहे. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान यामुळे वाचतात अनेकांचे प्राण , करोना काळात सामाजिक जाणीव ठेवून रक्तदान करून असे आव्हान उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे यांनी केले आहे.