
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
दि.22 सुभाष चंद्र बोस हे भारतातील स्वातंत्र लढ्यातील एक महान अग्रेसर क्रांतिकारी नेते होते . त्यांना संपूर्ण भारतभर नेताजी या नावाने ओळखले जाते. दुसऱ्या महायुद्धात भारतीय सेनेच्या आझाद हिंद फौजेच्या नेतृत्वाची जबाबदारी सुभाष चंद्र बोस यांच्याकडे होती.’ तुम मुझे खून दो , मैं तुम्हे आजादी दूंगा ‘ या सुभाषचंद्र नेताजीच्या घोषणेमुळे भारतातील अनेक तरुण स्वतंत्र लढ्यात सामील झाले .या त्यांच्या शब्दातील क्रांतिकारी घोषणेमुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची एक भावना जागृत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओरिसा प्रांतातील जगन्नाथपुरी जवळील ‘ कटक ‘ येथे २३जानेवारी १८९७ रोजी जानकीनाथ व प्रभावतीदेवी यांच्या पोटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला.
१९१८ ला ते तत्वज्ञान विषयात पदवीधर झाले सन १९२० मध्ये ते इंग्लंडमध्ये इंडियन सिव्हिल सर्विस परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र नंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी१८२१ आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. दुसरे महायुद्ध सुरू असताना भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणी इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने ” आझाद हिंद फौज ” स्थापन केली होती. त्यांनी दिलेला ” जय हिन्द ” चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. सुभाष चंद्र बोस यांनी पूर्व आशियात भारतीय राष्ट्रवादी चळवळीचे नेतृत्व केलं आणि जर्मनीत आजाद हिंद रेडिओ स्टेशन सुरु केले .
सुभाष चंद्र बोस यांच्या वर स्वामी राम कृष्ण आणि विवेकानंद यांचा विचारांचा फार मोठा प्रभाव शाळेत असतानाच पडला होता दोघांच्या अनेक ग्रंथाचे वाचन त्यांनी तेव्हा केले होते. दूरदृष्टी जबरदस्त आत्मविश्वास , धडाडी आणि निर्भयता यामुळे कोणत्याही प्रसंगी ते डगमगले नाहीत. त्यांची भारतीय स्वातंत्र्य वरील भाषणे , पत्रे , स्फुटलेखन इत्यादी स्वातंत्र्योत्तर काळात समग्र साहित्य प्रसिद्ध झाले. ऑल इंडियन पिलीग्रीम : अँन अनफिनिशड ऑटो बायोग्राफी अँड कलेक्टेड लेटर्स १८९७ – १९२१ हिचं चे आत्मवृत्त प्रसिद्ध झाले आहे .
सुभाष चंद्र बोस यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात घेता गेल्यावर्षी केंद्र सरकारने त्यांचे १२५ वे जयंती वर्ष ! निमित्ताने ” पराक्रम दिवस ” म्हणून साजरा केला , तसेच भारतीय रेल्वेने ऐतिहासिक हावडा कलकत्ता मेल या गाडीचे नाव बदलून आता नेताजी एक्सप्रेस असे केले आहे १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत२३ ऑगस्ट१९४५ जपानच्या दोमेई वृत्तसंस्थेने संपूर्ण जगाला कळले की १८ ऑगस्ट रोजी सुभाष चंद्र नेताजी चे विमान ताइवानच्या भूमीवर अपघात ग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच जखमी झालेल्या नेताजीं चे इस्पितळात निधन झाले .
थोर स्वतंत्र सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस शरीराने जरी निघून गेले तरी मात्र त्यांच्या भारतीय स्वतंत्र लढ्यातील मोलाच्या योगदानामुळे आजही प्रत्येक भारतीयाच्या मनामनात जिवंत आहेत आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन …