
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.22 डोळा हा आपल्या शरीरातील सर्वांत नाजूक अवयव आहे.परंतु डोळ्यात कचर गेलं किंव्हा इतर काही त्रास असला की आपण सहज त्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु यामुळे डोळ्याला मोठी इजा होऊन कायमचे अंधत्व येऊ शकते.तसेच खेड्यापाड्यातील अनेक गोरगरीब लोक हे शहरापर्यंत डोळ्याचा इलाज करण्याकरिता येऊ शकत नसल्याचे लक्षात आल्यावर संभाजी ब्रिगेडचे नांदुरा येथील समाजसेवेत सक्रिय असणारे तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील यांनी संपूर्ण तालुक्यातील लोकांच्या आयुष्यातील अंधकार मोफत नेत्र चिकित्सा करून दूर करण्याचा निश्चय केला.
सुरुवातीला तालुक्यातील १० गावे निवडून या गावांत १००% मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले.यामधे खेड्यातील लोकांना भाडे तोडे खर्च करून शहरापर्यंत येऊन तपासणी शुल्क यासाठी २००-३०० रुपये सहज खर्च येतो परंतु हा सर्व खर्च वाचवून मोफत नेत्र तपासणी शिबिर घेतले.तसेच ज्या लोकांना बाहेर डोळ्याच्या शस्त्रक्रियेचे २०-२५ हजार रुपये सांगितल्या गेले त्यांची ३ ते ५ हजारांत म्हणजेच अत्यल्प दरात नेत्र शस्त्रक्रिया करून दिली.
तसेच बाहेर ज्या चष्म्याची किंमत ८०० ते १००० रुपये आहेत ते चष्मे फक्त ३०० ते ५०० रुपयांत उपलब्ध करून दिले.यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव नेत्रचिकित्सक शरद पाटील यांनी पूर्णतोपरी मदत केली.संभाजी ब्रिगेडचे पूर्ण शिबिर व या शिबिराच्या माध्यमातून केलेल्या सर्व शस्त्रक्रिया ह्या पूर्णपणे यशस्वी झाल्या असून अनेक गरजू व गरिबांचे आशीर्वाद मिळाल्याने आणखी समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाल्याने संपूर्ण नांदुरा तालुक्यात हा उपक्रम राबवून लोकांना पुन्हा त्यांच्या डोळ्याने हे जग पाहण्याची क्षमता प्राप्त करून देण्याचा निश्चय संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील यांनी केला.
हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी दिलीप कोल्हे,मंगेश सोळंके,अभिषेक सोळंके,संतोष सोळंके,भगीरथ मनस्कार,विलास वक्टे,प्रतीक हेलगे,नागेश झांबरे,मंगेश बिचारे,शुभम बिचारे,युवराज बिचारे,प्रवीण मानकर,कुलदीप डंबेलकर,प्रदीप कुटे,गोपाल वायचोळ,अमोल पाटील या मित्रमंडळींनी सहकार्य केले