
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- कारेगाव डिव्हिजन वरील लाईट तीन दिवस पासुन खंडित ऑनलाइन शिक्षणावर व शेतकर्यांच्या पिकांना मोठा फटका लोहा तालुक्यातील कारेगाव येथील अकरा के व्ही वरती शेलगाव फिल्टर कारेगाव फिल्टर खडक मांजरी फिल्टर व्यवस्थित चालत असताना अतिरिक्त खडीमशीन ला पुरवठा केल्यामुळे अनेक गावांना या अतिरिक्त विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने तीन दिवस झाले कारेगाव, खडक मांजरी, वाळकेवाडी, सायाळ , शिवणी जामगा पांगरी भाद्रा अशा अनेक गावांना लाईट पुरवठा मागील तीन दिवसांपासून खंडित आहे.
त्यामुळे अतिरिक्त पुरवठा डिव्हिजन लोड सहन न करत असताना देखील अतिरिक्त लाईट इकडे तिकडे वळवल्याने अनेक गावावर आंधात राहण्याची वेळ आली आहे. बिल मात्र दाम दुप्पट पद्धतीने वसुली केले जात आहे . गावातील घरगुती मीटरवर युनिट कमी असताना देखील तीन पट येते बिल येत आहे. याला कारणीभूत कोण जबाबदारी कोणाची अशा अनेक शंका जनतेमधून व्यक्त होत आहेत जनतेने जायचे कुठे न्याय कोणाला मागायचा अशा सवाल ग्रामीण भागातील शेतकरी बांधव करत असताना दिसत आहेत. वारंवार विज पुरवठा खंडित झाला होत आहे या बाबी योग्य दखल घेऊन विद्युत वितरण कंपनी ने शेतकरी बांधवांना ईमानदार पणे विद्युत पुरवठा करावा अशी मागणी प्रगतिशील युवा शेतकरी रत्नाकर पाटील ढगे यांनी सदरील प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.