
दैनिक चालु वार्ता
मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडा : तालुक्यातील खोडाळा नजीक त्रिंबकेश्वर रस्त्यालगत असलेले राका नगर हे प्लॉट विक्रीच्या नावाखाली ग्राहकाची फसवणुक करत असल्याची बाब समोर आली आहे. मागील तीन ते चार वर्षा पूर्वी रवी बहादूर त्याचा साथीदार कैलास दुबे याने कवडीमोल किमतीने जागा विकत घेऊन, त्या जागेवर प्लॉट तयार करून हेच प्लॉट आता लाखो रूपायाला विकले जात आहेत परंतु धक्कादायक बाब म्हणजे ही जागा एन.ए नसतानाही प्लॉट ची विक्री केली जात असल्याने उघड उघड ग्राहकांची फसवणूक केली जात आहे परंतु असे असतानाही राका नगरच्या फेसबुक पेजवर मात्र एन.ए प्लॉट असल्याची बतावणी करून ग्राहकांना भुरळ घातली जात आहे अशा प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू आहे.
सदरची विकत घेतलेली जागा ही शेतजमीन असल्याने शासनाच्या नियमानुसार त्याठिकाणी कोणतेही बांधकाम करता येणार नाही. त्यासाठी ती बिन शेती (एन.ए) असणे आवश्यक आहे . परंतु या हरामखोरांनी शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून अनधिकृतपणे प्लॉट ची विक्री केली जात आहे. यामुळे ग्राहकांनी जरी प्लॉट खरेदी केले असले तरी त्यांना त्या ठिकाणी बांधकाम करता येणार नाही. यामुळे राजरोसपणे सामान्य ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या या महाठकांनवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. ग्राहकांनी प्लॉट खरेदी केले असले तरी ती जागा एन.ए नसल्यास त्या ठिकाणी बांधकाम करता येणार नाही. यामुळे पुढील चौकशी करुन कार्यवाही करु असे नायब तहसिलदार के.जी. ठाकरे. यानी सांगीतले. तसेच अधिक माहितीसाठी रवी बहादूर यांना वारंवार कॉल करूनही त्यांनी फोन उचलला नाही.
राका नगर नामांतर अनिधिकृत…..
एखाद्या नगराला किंवा परिसराला अधिकृत नाव देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत किंवा संबंधित एजन्सीची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्ज केला जातो व त्यांवर ग्रामसभा आयोजित करून व त्यामध्ये मंजुरीचा ठराव केल्यानंतर अधिकृत नाव दिले जाते परंतु राका नगर हे नाव अनिधिकृतच आहे. ग्रामसभेत कोणताही मंजुरीची ठराव झाला नसताना हे नाव देण्यात आले आहे. यामुळे ग्रामसभेला व ग्रामपंचायत ला फाट्यावर मारणाऱ्या या नगरच्या नामफलकावर कारवाई करून हा फलक ग्रामपंचायत ने हटवण्याची गरज आहे.