
दैनिक चालू वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
दि.22 भारतीय डाक विभागाच्या वतीने मुलींचे भविष्य संधी देत पोस्ट विभागा मध्ये विस्तृत श्रेणी केली आहे. सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची छोटी ठेव योजना आहे. आणि ती मुलींसाठी *बेटी बचाव बेटी पढाव* चा एक भाग म्हणून करण्यात आली आहे. मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी ही योजना आहे. दहा वर्षाखालील मुलींसाठी किमान अडीचशे रुपये सह खाते उघडले जाऊ शकते. 17 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत बुलढाणा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये समृद्धी योजनेचे खाते उघडण्याचे विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक सदस्य लाभार्थी ओळखून आणि जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये सुकन्या समृद्धी योजना चे खाते उघडून दहापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी अडीचशे रुपये योगदान देऊ शकतात. सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यानंतर आपण आय पी पी बी खात्यामार्फत आपली पुढील भरणे ऑनलाईन पद्धतीने करू शकता.फक्त 250 रुपये मासिक एवढं योगदान द्या आणि मुलीच्या आर्थिक सक्षमीकरणाचा दिवा लावा.तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्याबाबत असे आव्हान उपविभागीय अधिकारी मलकापूर येथील नरेश शिंदे, पोस्टमास्टर मुरली धर पांडे नांदुरा यांनी केले आहे.