
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे जिल्हा
गुणाजी मोरे
पुणे :- पुण्यातील एका उच्चशिक्षित महिलेवर कौमार्यभंगाचा ठपका ठेऊन सासरच्या लोकांनी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. 28 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार अमेरिकेत राहणाऱ्या नवऱ्यासह सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जग एवढं पुढे गेले आहे, तरीही आज काही लोकांची मानसिकता बदलेली दिसत नाही. पुण्यात कौमार्य भंगाचा ठपका ठेवून सूनेवर आत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका उच्चशिक्षित महिलेवर कौमार्यभंगाचा ठपका ठेऊन सासरच्या लोकांनी तिचा छळ केल्याची तक्रार विवाहित महिलेने दिलीय. 2020 साली उच्चशिक्षित असणाऱ्या जोडप्याचा विवाह झाला. लग्नानंतर नवरा नोकरीनिमित्त अमेरिकेला गेला.
त्याच्यापाठोपाठ बायकोही गेली. दरम्यान मधुचंद्राच्या पहिल्या रात्री बायकोला ब्लिडिंग का झाले नाही?, अशी विचारणा नवऱ्याने केली. लग्नाच्या आधी कोणासोबत शारीरिक संबंध होते का? अशी विचारणा करून नवऱ्याने वारंवार भांडण काढली. संबंधित महिलेला मारहाण करून घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकलाय, सध्या नवरा अमेरिकेत असतो, बायकोला सोबत ठेवण्यास त्याने नकार दिला आहे. या महिलेनं हडपसर पोलिसांत याबाबतची तक्रार दिली आहे.
दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादी महिलेने हडपसर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी 498 अ, 323, 504, 506, 34 इत्यादी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कौटुंबिक वादाच्या अनुषंगाने जरी गुन्हा दाखल असला तरी कौमार्य भंगाचा ठपका आजही विवाहितेवर ठेवला जातो ही गंभीर बाब आहे. घटस्फोट देण्यासाठी तिचे लग्नाआधी अनैतिक संबंध असल्याचा आरोप सासरच्या कुटुंबीयांनी केलाय. कौमार्य भंग हे घटस्फोटासाठी कारण असू शकतं? सुशिक्षित लोकांकडून असे आरोप होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.