
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
कळमनुरी :- कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषदादा बांगर यांनी महाराष्ट्र सरकारचे जलसंपदा व लाभक्षेञ विकास मंञी मा.जयंतजी पाटील यांना दि.२२ जानेवारी २०२२ शनिवार रोजी लेखी पञ पाठवून मराठवाडयाचे भुमिपुञ शुरवीर आद्यक्रांतिवीर नोवसाजी नाईक यांचे नांव कळमनुरी मतदारसंघातील ईसापुर पैनगंगा प्रकल्पास त्वरीत देण्याची मागणी केली. त्यांनी पञात लिहिले आहे की, मराठवाडयाच्या भुमिमधील नाव्हा ता.हदगांव जि.नांदेड येथिल शुरवीर आद्यक्रांतिवीर नोवसाजी नाईक व त्यांच्या १५०० साथीदारांनी इंग्रज व निजामाच्या सशस्त्र ६००० सैन्या विरूध्द दि.८ जानेवारी १८१९ ते दि.३१ जानेवारी १८१९ या कालावधी मध्ये स्वातंञ्य मिळविण्यासाठी घनघोर लढाई केली. या लढाई मध्ये राजे हौसाजी नाईक व इतर ६०० साथीदारांना वीरमरण आले.
आम्ही भारतीय स्वातंञ्याचा संपूर्ण देशात अमृत महोत्सव मोठया उत्साहत साजरा करत असताना शौर्य भुमि नाव्हा ता.हदगांव जि.नांदेड येथिल शुरवीर आद्यक्रांतिवीर नोवसाजी नाईक व त्यांच्या साथीदारांनी इंग्रज व निजाम सैन्या विरूध्द केलेल्या सशस्त्र लढाईला दि.३१ जानेवारी २०२२ रोजी २०३ वर्ष पूर्ण होत आहेत. ईसापूर धरण ता.पुसद जि.यवतमाळ येथे शुरवीर आद्यक्रांतिवीर नोवसाजी नाईक यांचे काही वर्ष वास्तव्य होते.त्यांच्या इतिहासाची भावी पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी आणि त्यांचे नांव अजरामर राहण्यासाठी ईसापुर पैनगंगा प्रकल्पास मराठवाडयाचे भुमिपुञ शुरवीर आद्यक्रांतिवीर नोवसाजी नाईक यांचे नांव त्वरीत द्यावे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषदादा बांगर यांनी ईसापूर पैनगंगा प्रकल्पात शुरवीर आद्यक्रांतिवीर नोवसाजी नाईक यांचे नांव देण्याची मागणी केल्याबदल ईसापूर पैनगंगा प्रकल्पात मराठवाडा-विदर्भातील ४५ गावातील बुडीत क्षेञातात गेलेल्या सर्व धरणग्रस्त जनता,आद्यक्रांतिवीर नोवसाजी नाईक यांचे वंशज व त्यांचे साथीदार कुटुंबीय आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने जाहिर आभार मानण्यात आले.