
दैनिक चालु वार्ता
लोहारा प्रतीनीधी
महेश गोरे
कदमापूर (ता. उमरगा): प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने दि. १५ ते ३१ जानेवारी दरम्यान वाचन संस्कृती जागरण पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत आज दि. २३ (रविवार) रोजी कदमापूर येथे गावभर ग्रंथदिंडी वाजत-गाजत फिरवण्यात आली. ग्रंथदिडी मिरवणूकीला सुरुवात करण्याआधी छ.शिवाजी महाराज व उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला मा. आशुतोष महाराज यांनी पुष्पाहार घालून अभिवदन केले. तद्नंतर ग्रंथदिंडीच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजवण्यासाठी जागृती निर्माण करण्यात आली. ग्रंथदिंडीसोबत गावातील विद्यार्थी, तरुण, महिला व अबालवृद्ध सहभागी झाले होते. गावातील काही नागरीकांनी ग्रंथदिंडीला पुस्तके भेट दिली.
ग्रंथदिंडीला विश्राम दिल्यानंतर प्रा.शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयाच्या इमारतीत मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मा. रंजनाताई मंडले होत्या. तर प्रमुख पाहूणे म्हणून मा. आशुतोष महाराज, प्रमुख वक्ते म्हणून सर्पमित्र अनिल गरुड, मार्गदर्शक म्हणून किशोर औरादे व राजू बटगिरे सर यांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी व नागरीकांना ‘वाचनाचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश कुंभार यांनी केले तर आभार करिश्मा मुठले यांनी मानले. याप्रसंगी श्रावण आगडे, मारुती कुंभार, देविदास कुंभार, लक्ष्मीबाई बेबळगे, मंगल पाटील उपस्थित होते.
पंधरवड्यातील पुढील कार्यक्रम कोळसूर (गुं.), बेट जवळगा, सालेगाव, आनंदनगर आणि कानेगाव याठिकाणी होणार आहेत.