
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कलंबर सर्कल
हनुमंत श्रीरामे
नांदेड :- मनपाच्या आरोग्य विभागातील माहिती आज दिनांक 22 जानेवारी 2022 शनिवार दिवसेंदिवस नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात औषध उपचारानंतर रुग्णालयातून रुग्णाला सुट्टी देण्यात येत आहे. नांदेड शहरामध्ये भक्ती लॉन्स येथे कोरोनाबाधित रुग्णावर उपचार केले जाणार आहेत. भक्ती लॉन्स मध्ये 100 बेड ccc सेंटर तयार करण्यात आले आहे.यामध्ये गोरमेंट कॉलेज,आयुर्वेदिक कॉलेज,आणि नाना नानी पार्क येथून रुग्ण रेफर झाल्यानंतर त्यांना भक्ती लॉन्स येथे उपचार देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.