
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी भरत पवार
औंढा :- नागनाथ नगरपंचायत निवडणुक नुकतीच पार पडली त्यामध्ये शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली पक्षाचे नऊ उमेदवार बहुमताने विजयी झाले .औंढामध्ये एकूण सतरा जागेसाठी निवडणुक पार पडली. स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. शिवसेना बहुमतात आल्यामुळे सेनेला कुणाचीही हातमिळवणी करण्याचे काम नसल्याने, औंढा नगरपंचायत वर सेनेचा झेंडा हे चित्र स्पष्ट झाले आहे.
शिवसेना पक्षाचाच नगराध्यक्ष नियुक्त होणारच ! या नगराध्यक्षा पदाच्या स्पर्धेमध्ये माननीय संतोष दादा बांगर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले व शिवसेना पक्षाच्या उमेदवारांपैकी सर्वात जास्त बहुमताने निवडून आलेले श्री मनोज शंकरराव काळे एकनिष्ठ शिवसैनिक व सर्व काळ जनसामान्यांच्या सेवेमध्ये कार्यरत असलेले , सर्वांच्या सुख दुःख मध्ये धावून जाणारे नेतृत्व मनोज शंकरराव काळे यांची चर्चा नगराध्यक्षपदासाठी होत असताना दिसून येते आहे.