
दैनिक चालु वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनधी
अंगद कांबळे
रायगड :- को ए सो. प्रभाकर पाटिल हायस्कूल काळसूरी व पी. न पी पाष्टि हायस्कूल च्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. लाल सलाम,संघर्षनायकांचा पक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आपलासा करणारा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष.ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून संघर्षशील नेतृत्वांचा उदय झाला त्याप्रमाणेच आपल्या रायगड जिल्ह्यात सुद्धा भाऊ म्हणून परिचित असलेले प्रभाकर पाटील नावाचे एक झंझावात उदयास आले.लहानपणापासूनच संघर्षाचे प्रखर अस्त्र मिळालेले प्रभाकर पाटील साहेब हे आपल्या कार्याने रायगडचेच नाही तर कोकणचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाऊ लागले.
आज कष्टकरी ,शेतकरी तसेच जनसामान्यांचा आधारवड असलेले ,गोरगरिबांचे कैवारी प्रभाकर नारायण पाटील यांची जयंती आहे.त्यामुळे आपल्या नेत्यांची ओळख नव्या पिढीला होणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून नेहमीप्रमाणे आपल्या नेतेमंडळींचा स्मरण आपल्या नेत्यांचे या लेखमालिकांद्वारे त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊन शेकापच्या संघर्षनायकांची गाथा त्यांच्या जयंतीदिनानिमित्त तसेच स्मृती दिनानिमित्त मांडत असतो.
जगातील सर्वात मोठा शेतक-यांचा संप घडवून आणणारे शेतकरी नेते नारायण पाटलांचे सूपुत्र असणारे प्रभाकर पाटील हे आयुष्यभर शेतक-यांच्या ,कामगारांच्या हितासाठी एकच झेंडा घेऊन संघर्ष करत राहीले.आपल्या आगरी समाजातील कष्टकरी जनतेचा विकास व्हावा यांसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले.जनसामान्यांचे भाऊ म्हणून ते रायगडचे भाग्यविधाते झाले.हाडाचे पत्रकार असणारे प्रभाकर पाटील हे रायगडमधील सामाजिक ,सांस्कृतिक क्रांतीचे जनक मानले जातात.सहसा घाटमाथ्यावर दिसणारे साखरकारखाने आपल्या रायगड जिल्ह्यातही असावेत यांसाठी ते आयुष्यभर सरकार दरबारी प्रयत्न करत राहीले.
त्यांसाठी त्याकाळी त्यांनी अनेक कृषी तज्ञांच्या भेटी घेऊन ऊसासाठी लागवडी योग्य ५०० हेक्टर क्षेत्राची चाचपणी केली.रायगडमधील शेतक-यांना भातपिकांच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता यांवी यांसाठी त्यांनी सहकार क्षेत्रात प्रचंड काम केले.यांसाठी त्यांनी विविध शिखर संस्थांची स्थापना केली.आरडीसी बँकेंच्या मार्फत शेतक-यांना अल्पदरात कर्ज पुरवठा करून शेतक-यांच्या सर्वांगिण विकासास हातभार लावला तसेच श्रीबाग,पंतकृपा या सहकारी पतसंस्थांची पायाभरणी करून ग्रामीण भागातील व्यावसायिकांना कर्जाच्या स्वरूपात मदत करून त्यांच्या व्यवसायाला चालना दिली.साहेबांनी सहकारी तत्वावर भात गिरण्यांची निर्मिती करण्याचे कामही केले.त्यांनी सुरू केलेल्या पोयनाड,फणसापूर शिरवली ,कुर्डूस ,कामार्ले या ठिकाणच्या भातगिरण्या आजही सुस्थितीत आहेत.
मागासलेल्या आपल्या समाजाला शिक्षणाशिवाय प्रगती साधता येणार नाही हे ओळखून त्यांनी शिक्षणक्षेत्रात कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जिल्ह्यात शाळा ,महाविद्यालये तसेच तांत्रिक शिक्षण संस्थांचे जाळे विणले.आज पी एन पी च्या माध्यमातून चित्रलेखा ताई हा वारसा अविरतपणे पुढे नेत आहेत हे नक्कीच अभिमानास्पद आहे.आपल्या वडीलांनी सुरू केलेल्या कृषिवल या साप्ताहीकाचे दैनिकात रूपांतर करून समाजात घडत असलेल्या अनिष्ठ गोष्टींविरूद्ध जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली.शहरी ग्राहकों प्रमाणेच ग्रामीण भागातील जनतेला सुद्धा चांगल्या घरगुती उपयोगी वस्तु चांगल्या स्वरूपांत मिळाव्यात यांसाठी वारणा बाजाराच्या धर्तीवर रायगड बाजार सुरू करून अनेक महीलांना तसेच तरूणांना रोजगार मिळवून दिला.
सेवेचे ठायी तत्पर पाटील प्रभाकर असे त्यांचे ध्येयवाक्ये आणि वृत्ती राहीली.रायगड जिल्हा परिषदेचे सुमारे ११ वर्ष अध्यक्षपद सांभाळताना त्यांनी जिल्ह्यात विकासकामांचा झंझावात निर्माण केला . त्यांनी विविध प्रकल्पांची पायाभरणी आपल्या कार्यकाळात केली.कधीच न झालेला पण लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला आमदार म्हणून तेरा वर्षे जिल्ह्याचे नेतृत्व करताना त्यांनी नेत्यापेक्षा जनसेवकाचीच भूमिका पार पाडली.आपल्या लेखणीला अस्त्र बनवून त्यांनी जनसामान्यांसाठी न्यायाचे दरवाजे उघडे केले.आपल्या अमोघ अशा वकृत्वांतून त्यांनी जनसामान्यांच्या मनावर राज्य केले.
जातीयवाद्यांविरूद्ध संघर्ष आणि शेतक-यांचे कल्याण हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच वडील नारायण पाटलांच्या तत्वांचा आणि शिकवणुकीचा जागर त्यांनी आयुष्यभर केला आणि प्रबोधनाचे मौलिक कार्य केले.या लढाईतून मिळालेली सत्तेची सर्व पदे त्यांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठीच वापरली.पुरोगामी राजकारणाची अत्यंत निष्ठेने जपणूक करून रायगडच्या मातीत शेकापची बीजे रूजविणा-या माझ्या लाल बावट्याच्या स्वाभिमानी नेत्याला जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन तसेच आदरपूर्वक लाल सलाम….
(शब्द संकलन -संदीप दीघोडकर )