
दैनिक चालु वार्ता
लोणखेडा सर्कल प्रतिनिधी
हिम्मत बागुल
लोणखेडा :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा सन 2022 चे वार्षिक दिनदर्शिका प्रकाशन सोहळा शहादा तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते त्याच्या कलावती फार्म सोमावल येथे शिक्षक परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नंदुरबारच्या शाखा स्थापनेपासून आजतागायत शिक्षक परिषदेने राष्ट्रहित , शिक्षणहित, विद्यार्थीहित आणि शिक्षकहित या चतुसूत्री आधारित केलेल्या विविध कार्याचे जिल्हाभरात राबवलेल्या विविध उपक्रमांचे शिक्षक हितासाठी केलेले आंदोलने , मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठका, खुले अधिवेशन, निवासी अभ्यास वर्ग , शैक्षणिक परिसंवाद, जिल्हा परिषदेतील बैठका, विविध सामाजिक उपक्रम , रक्तदान ,फराळ वाटप, बिरसा मुंडा जयंती, शिवजयंती भारतमाता पूजन, संविधान पूजन अश्या विविध सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रीय उपक्रमांची माहिती छायाचित्रासहित सदर 2022 ची रंगीत वार्षिक दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली असून सदर दिनदर्शिका प्रत्येक पंचायत समिती व जिल्हा परिषद आणि नंदुरबार जिल्ह्यातील 1398 जिल्हा परिषद शाळांना विनामूल्य भेट देण्यात येणार आहे.
शिक्षक परिषदेचे कार्य निश्चित उल्लेखनीय असून एक मजबूत संघटन शिक्षक परिषदेने उभारलेले आहे राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन शिक्षक परिषद काम करत आहे. शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी ज्या ज्या वेळेस माझी आवश्यकता भासेल त्या त्या वेळेस सर्वतोपरी मी आपल्यासोबत राहणार असल्याचे सांगून शिक्षक परिषदेचा पालक असल्याचा मला मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश पाडवी यांनी याप्रसंगी करत शिक्षक परिषदेच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सदर प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड यांनी केले तर संचलन जिल्हा कार्यवाह किरण घरटे यांनी केले परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, नाशिक विभागाचे कार्यवाह रामकृष्ण बागल, विभागाचे विभागाचे सदस्य आबा बच्छाव, जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष शरद घुगे, संघटनमंत्री प्रकाश बोरसे, जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय सूर्यवंशी व दिनेश मोरे, जिल्हा नेते देवेंद्र बोरसे, प्रसिद्धी प्रमुख मनोज चौधरी, कार्यालयीन मंत्री जगदीश पाटील, जिल्हा सहकार्यवाह किशोर ठाकरे, महिला आघाडीच्या प्रमुख चेतना चावडा, सरिता काळे,चेतना तावडे, वैशाली घुगे,शुभांगी सोनवणे,वंदना न्हावडे, तळोदा तालुका अध्यक्ष मानसिंग पाडवी, तालुका कार्यवाह रणधीर भामरे , मगन पाडवी, जयवंत वळवी , कुवरसिंग किराडे , गोमा पावरा,रतिलाल पावरा ता महिला अध्यक्ष श्रीमती लता पावरा , गोकुळ मोरे, अनिल माळी , हेमराज माळी चुणीलाल वसावे शहादा तालुका सिद्धार्थ बैसाणे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र सानप तालुका प्रसिद्धी प्रमुख संजय गिरासे तालुका संपर्क प्रमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.