
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे जिल्हा
गुणाजी मोरे
पुणे :- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त पुरंदर-हवेली विधानसभा प्रमुख, मा पंचायत समिती सदस्य श्री.शंकरनाना हरपळे यांच्याकडून भेकराईनगर, फुरसुंगी परिसरातील नागरिक व बंधू भगिनींसाठी २१ लाखांचा आरोग्य पूर्ण लाभ यामध्ये १० लाखापर्यंत चे मोफत उपचार, १० लाखांपर्यंत वैयक्तिक व व्यावसायिक कर्ज,
१ लाखांचा अपघाती विमा, PMF चे आरोग्य आधारकार्ड अगदी मोफत देण्यात आले,या अतिशय महत्त्वाच्या आरोग्य योजनेचा पाच हजार नागरिकांनी लाभ घेतला.
या आरोग्य योजनेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्कहार घालून शिवसेना पुणे शहर प्रमुख श्री संजय मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषद सदस्या, सरपंच सौ कौशल्यानानी शंकरनाना हरपळे,जिल्हा परिषद सदस्य श्री बाजीराव आबा सायकर,
पंचायत समिती सदस्य,उपसरपंच उरूळी देवाची,श्री राजीवशेठ भाडळे,उपशहरप्रमुख श्री राजाभाऊ होले,उपसरपंच श्री संदिपकाका हरपळे, युवानेते श्री पिंन्टूशेठ हरपळे, महिला आघाडी शिवसेना सौ निर्मलाताई मेमाणे, श्रीवास्तव भाभी,रंजना ढेरे,हनुमंत हरपळे,
नितिन हरपळे,दादा कामठे,नितिन कामठे,गणेश कामठे, संतोष आबनावे,संदिप गद्रे, संतोष गद्रे,राहुल पवार, योगेश कुंजीर,धनंजय गुंजाळ,सचिन बाठे,शादाब मुलाणी, मुन्ना मुलाणी,सतिश धोत्रे, सुभाषनाना मेमाणे,राजेश मांढरे, विनोद सातव, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती सदस्य श्री शंकरनाना हरपळे यांनी नागरिकांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या व्यवसायाचीही काळजी घेतल्याचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दैनिक चालु वार्ता प्रसार माध्यम न्यूज चॅनल शी बोलताना सांगितले, भेकराईनगर फुरसुंगी परिसरामध्ये हरपळे यांचे नागरिकांमधून आभार व्यक्त केले जात आहेत.