
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधी
मारोती कदम
वडेपुरी :- प्रनिताताई देवरे चिखलीकर यांनी दोन वर्षांपूर्वीअनेक गावे पाणीदार करण्यासाठी पाणीदार चळवळ मोहीम पाणी फाउंडेशन च्या वतीने आपली हाती घेतली ,गावकऱ्यांच्या श्रमदान योजनेतून व ताईच्या प्रेरणेतून गावोगावी अनेक तळी खोदली होती,नाले सरळीकरण, झाले आणि याचे फलित म्हणून प्रत्येक गावांमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे व त्या गावांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत ,त्या गावांमध्ये वडेपुरी ,कलंबर, निळा,शेलगाव, गुंडेवाडी, ढाकणी, या गावांचा समावेश आहे, या प्रत्येक गावामध्ये जाऊन ग्रामस्थाशी प्रणिता ताई देवरे यांनी संवाद साधला .
पाण्याची पातळी वाढल्याचे उत्पन्न वाढल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी व कोरडवाहू शेतीवर विसंबून न राहता पाणी पातळी वाढवण्यासाठी पुन्हा पाणीदार चळवळीच्या मोहिमेकडे वळावे असे सांगत असताना, प्रणिताताई यांनी नवीन ग्राम समृद्ध योजना आली आहे ,आणि त्या योजनेमध्ये पाणी फाउंडेशन च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे. त्यांच्यासोबत सभापती आनंदा पाटील शिंदे ,उपसभापती नरेंद्र गायकवाड, सूर्यकांत पाटील गायकवाड ,मारोती कदम शेलगाव,आदी मंडळी प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन लोकांचे प्रबोधन करू लागलेले आपणास दिसून येते ,येथे गावकऱ्यांशी संवाद साधताना जलरागिनी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, व जि प सदस्य सौ प्रणिता ताई देवरे चिखलीकर मार्गदर्शन करताना या वेळी पाणी फाऊंडेशनचे मराठवाडा समन्वय संतोषजी शिंनगारे ,चेअरमन भगवानराव पाटील ,सरपंच बालाजी गजले, उपसरपंच गजू मोरे, राजू इंगळे, लक्ष्मण पाटील बोडके, शंकर पाटील ढगे माजी सभापती लोहा, काळबा पाटील शिंदे उपसरपंच ढाकणीकर ,आर आर पाटील माजी उपसभापती आदी कार्यकर्ते या चळवळीमध्ये सक्रिय सहभागी दिसून आले.
गावोगावी जाऊन कोरोणाचे नियम पाळून गावकऱ्यांना त्यांनी पाण्याचे जलयुक्त शिवार याचे महत्त्व पटवून देऊन गावातील पाणी पातळी वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते त्यांचे प्रत्येक गावकऱ्यांना असे मार्गदर्शन लाभत आहे आणि खरोखरच पुन्हा एकदा प्रत्येक गावागावांमध्ये ग्राम समृद्ध आणि योजना राबविण्यात येतात प्रणिताताई देवरे यांचे कार्य कौतुकास्पद आहे व एक सामाजिक उपक्रम चांगला आहे हे त्यांच्या कार्यातून दिसून येते