
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा दि.24 :- बहुजनांचे हृदयस्थान श्रद्देय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केलेला राजकीय शोशल इंजीनियरिंग प्रयोगाचाच भाग म्हणुन प्रदेश अध्यक्षा मा.रेखाताई ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष मा.निलेश जाधव यांचे उपस्थितीत तसेच बुलडाणा शहर अध्यक्ष मा.मिलींद वानखडे, शहर महासचिव दिलीप राजभोज, विजय राऊत व शहर पदाधिकारी यांचे नेतृत्वात बुलडाणा शहरातील बहुसंख्य तरुणांनी वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश दिनांक 23 जानेवारी ला बुलडाणा शहर जनसंपर्क कार्यालय येथे घेतला.
पक्ष प्रवेश घेणा-या मधे इरफान शे.कासम, मो.मुज्जमील, चंद्रकांत मिसाळ, राजु वानखेडे, अन्सार शेख, वैभाव हिवाळे, गजानन पगारे, रोहीत जाधव, संदिप मगर, राजेंद्र मिसाळकर, सत्यपाल डोंगरे, विजय डुकरे, सुरेश गवई, आकाश हिवाळे, गौरव पाडमुख, निलेश गायकवाड, आकाश निकम, चंद्रकांत झिने, मयुर मोरे, प्रकाश जाधव, प्रणव मोरे आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला.
प्रसंगी शहर अध्यक्ष मिलींद वानखडे बोलतांना या तरुणांना पक्षात आदराची वागणुक मिळेल व त्यांना येणा-या स्थनिक नगर पालिका निवडणुकीत सत्तेत सहभागी करुन घेवु अशी ग्वाही दिली.
या पुढेही बुलडाणा शहरातील सर्व समाज घटकातिल घरांपर्यंत व घरातील प्रत्येक माणसापर्यंत पक्षाची भुमिका आमच्या कडुन पोहोचवली जाईल असे मत शहर अध्यक्ष मिलींद वानखडे यांनी बोलुन दाखवले, या वेळी शहर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.