
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.24 राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ नागपूर जिल्हाध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे पत्रकार श्री. सतीश भालेराव यांना हिंगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बळीराम परदेशी यांनी जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली आहे.पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्या या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा तसेच नांदुरा येथे पत्रकार भवणासाठी अनेकदा लोकप्रतिनिधी व शासन दरबारी निवेदने देऊन सुद्धा पत्रकार भवन बांधून मिळाले नाही.म्हणून नांदुरा येथे तात्काळ पत्रकार भवन उपलब्ध करून द्यावे.
जेणेकरून येथे सामान्य व्यक्तींपासून ते शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना पत्रकार परिषदेसाठी योग्य जागा उपलब्ध होईल. या मागणीचे निवेदन आज दिनांक २४ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा वतीने नांदुरा तहसील मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर इंगळे,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष योगेश धोटे,तालुका उपाध्यक्ष शिवाजी चीमकर,तालुका कार्याध्यक्ष राहुल खंडेराव,तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल बिचारे,तालुका सचिव महेंद्र वानखडे,शहराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल व इतर पत्रकार उपस्थित होते.