
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
दि.24 जळगांव जा :- स्थानिक सद्गुरू बनाना रायपनिंग चेंबर, प्रभाग क्र 1 येथे दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी तालुका व शहर भा रॉ काँग्रेस कमिटी व सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने रवी मिलन व निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम काँग्रेस सेवादल चे शहर अध्यक्ष अन्सार बाबूसाहेब व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
त्यानंतर निर्धार मेळावा घेण्यात आला. ह्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून मा अन्सार बाबूसाहेब तर प्रमुख अतिथी म्हणून पक्षनेत्या मा डॉ सौ स्वातीताई वाकेकर,जिल्हा उपाध्यक्ष मा प्रकाशभाऊ पाटील,तालुकाध्यक्ष मा अविनाशभाऊ उमरकर माजी महिला काँग्रेस अध्यक्षा ऍड मा सौ ज्योतीताई ढोकने,सेवादल प्रदेश सरचिटणीस,मा राजेश्वर देशमुख,मा अच्छे खा पठाण,ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मा राजीवभाऊ घुटे,किसान सेल जिल्हाध्यक्ष मा राजुभाऊ पाटिल,सेवादल युवा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष मा अमितभाऊ तायडे, माजी तालुकाध्यक्ष मा कैलासभाऊ बोडखे,सेवादल तालुकाध्यक्ष मा मोहनभाऊ जयस्वाल, मा बाळूभाऊ गिरी,शहर अध्यक्ष मा अर्जुन भाऊ घोलप,सेवादल जिल्हा उपाध्यक्ष मा श्रीकृष्णभाऊ केदार, महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा, सौ राधाताई खापट,शहर अध्यक्षा मा सौ मीनाताई सातव,माजी आरोग्य सभापती मा सौ अर्चनाताई घोलप,सौ रब्बानीताई देशमुख,सौ, यमुनाबाई घोलप,सौ सरस्वताबाई म्हस्के यांची उपस्थिती लाभली होती.
त्याचप्रमाणे डॉ संदीप वाकेकर, माजी नगरसेवक ऍड संदीप मानकर,कलीम खान,मा विनोदभाऊ धंदर,मा ओ पी तायडे साहेब,मा वसंतभाऊ धुर्डे,मा विजुभाऊ हिस्सल,मा समाधान भाऊ दामधर,मा किसनाभाऊ दामधर,मा महेंद्र बोडखे,मा प्रमोदभाऊ पाटील, मा सलामखा,मा प्रल्हाद राऊत, मा सचिन हरमकर,मा पांडुभाऊ घोलप, मा नामदेव भाऊ घोलप,मा राजीक भाई, मा हुसेन भाई,मा ज्ञानेश वानखडे, मा हुसेनभाई डायमंड, मा देविदास सावरकर, मा संदीप फुसे,अजय पारस्कार, मा असदुल्लाखा, मा दिनेश काटकर, मा दीपक राजपूत,मा पप्पू कळष्कर,मा अरूण तायडे, मा रमेश इंगळे,मा नासिर भाई, मा अमोल मानकर, मा दीपक राजपूत मा हुसेन राही, मा मो नजाकत,मा राजूभाई, मा सादिक देशमुख, मा राजू शेख,मा शंकर भाऊ म्हस्के, मा अनंत फुसे, मा कैलास हांडे,मा गजाननभाऊ नानकदे,मा गजाननभाऊ भगत, मा लक्ष्मणभाऊ ढगे,मा मधुभाऊ ढगे,मा राजू राऊत व ईतर असंख्य कॉग्रेसजण उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनियुक्त पदाधीकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. विलास बाप्पू ओताडे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल. तेजेंद्रसिहं चौहान अध्यक्ष. बुलढाणा जिल्हा काँग्रेस सेवादल. संजय जी राठोड उपाध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी. सुदीप चाकूते अध्यक्ष यंग ब्रिगेड. पंकज दादा पांडे विदर्भ प्रमुख यंग ब्रिगेड. मनिषजी नेमाडे निरीक्षण बुलढाणा. यांच्या आदेशानुसार याप्रसंगी यंग ब्रिगेडच्या शहर अध्यक्ष पदी मा किशोर अंबडकार, उपाध्यक्ष पदी मा विनोद राऊत,मा करन नितवणे,शेख फारूक शेख राजीक,मा सचिव पदी मा रत्नदीप चऱ्हाटे, मा रोहन धुंदाळे, यांच्यासह ईतर अनेक पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
त्याचप्रमाणे सोशल वारीयर्स म्हणून मा राजकुमार राजपूत,मा संतोष गावंडे व मा रवींद्र बोडखे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व हार अर्पण करून सत्कार करण्यात आला व त्यानंतर उपस्थित मान्यवर मा अविनाशभाऊ उमरकर,मा कैलास भाऊ बोडखे, मा अमित तायडे,मा ओ पी तायडे साहेब, मा राजुभाऊ घुटे, मा राजकुमार राजपूत, मा रवींद्र बोडखे,मा राजेश्वर देशमुख, मा ज्योतिताई ढोकने,मा प्रकाशभाऊ पाटील यांची यथोचित भाषणे झाली.जळगांव जामोद मध्ये भा रा काँग्रेसची सत्ता आणण्याचा निर्धार ह्याप्रसंगी करण्यात आला.
प्रास्तविक मा अर्जुन घोलप व मा अविनाश उमरकर यांनी केले तर संचालन मा श्रीकृष्ण केदार तर आभार प्रदर्शन मा मोहन जयस्वाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काँग्रेस व सेवादल च्या असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.