
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- महाराष्ट्र ही संत आणि महंत यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भुमी, महाराष्ट्र देशाात संपन्न असण्याचे कारण या पावनभूमीत अनेक संत आणि महंत यांनी आपले संबंध जीवन लोककल्याणासाठी संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा आणि भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समर्पित केले, आपल्या अध्यात्मिक ज्ञानाचा वसा व वारसा महाराष्ट्राला दिला याच संत परंपरेतील एकोणीसाव्या शतकातील संत वामनभाऊ महाराज एक महान तपस्वी संत. सामाजिक परिवर्तन सहज होत नसत त्यासाठी अनेक महापुरुष यांनी आपले जीवन समर्पित केलेले असते.
महाराष्ट्राच्या पावन भूमीत संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी, संत गाडगे महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत नामदेव महाराज, संत कान्होपात्रा, संत गजानन महाराज, संत स्वामी समर्थ, साई बाबा असे संत महापुरुष, सिद्धपुरुष, होऊन गेले. पंढरपूर, देहू, आळंदी, शिर्डी, शेगांव, पैठण, अक्कलकोट असे अनेक नामांकित अध्यात्मिक पीठ या महाराष्ट्रात आहेत. अठराव्या शतकाच्या शेवटी व एकोणवीसाव्या शतकाच्या सुरुवातीला देशात इंग्रजांची राजवट चालू होती. स्वातंत्र्य भारत चळवळ शेवटच्या टप्प्यात होती.
भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील काही भाग व मराठवाडा हा हैद्राबादस्थित निझाम यांच्या संस्थानात होता. दरम्यानच्या काळात रजाकारांची प्रचंड दडपशाही होती. दि.01/01/1891 रोजी बीड जिल्ह्यातील फुलसांगवी जि.बीड गावात. माता राहीबाई भाग्याची खाण ! पिता तोलाजी हा पुण्यावान !!पुत्र जन्मला रत्नासमान ! तयासी शोभे नाव वामन !!
तोलाजी ग्यानबा सोनवणे व राहीबाई तोलाजी सोनवणे यांच्या पोटी संत वामनभाऊ महाराज यांचा जन्म झाला.
जन्मानंतर अवघे 40-50 दिवसात आईचे वैकुंठ गमन झाले, आईचे छत्र हरवले, आज्जीला पान्हा फुटला, बाल अवस्थेतील सांभाळ आजीने केला. आईचे प्रेम, माया, आपुलकी भाऊंना मिळाली नाही. अगदी बाल अवस्थेत अध्यात्मिक गोडी ज्ञान साधना किर्तन ऐकणे, भजन गायन या विषयी प्रचंड आवड होती. बिकट परिस्थिती असतांना सुद्धा प्राथमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर संबंध जीवन हे समाजसेवेसाठी, लोककल्याणासाठी समर्पित करण्याचा निर्णय बाल अवस्थेतील वामनभाऊ महाराज यांनी घेतल्याने प्राथमिक शिक्षणानंतर ज्ञानीयांचा राजा अशी ओळख असणार्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीत भाऊ पोहचले.
आळंदीत अध्यात्मिक शिक्षण घेत असतांना एकेदिवशी संत भगवान बाबा व संत वामनभाऊ महाराज यांची भेट झाली, परिचय झाला. एकमेकांना प्रेमपुर्वक अलिंगण दिले. संत वामनभाऊ महाराज हे संत भगवान बाबा पेक्षा वयाने 5 वर्ष मोठे असल्याने भगवान बाबांनी आदरपुर्वक भाऊ ही उपाधी दिली आणि त्या दिवसापासून संत वामनभाऊ महाराज हे भाऊ म्हणून संबंध राज्यभर प्रसिद्ध झाले. बारा वर्षाचे अध्यात्मिक शिक्षण पुर्ण झाल्यानंतर आळंदी येथील निरोप घेवून बाला घाटातील डोंगर रांगात असणारे नाथ सांप्रदायातील नऊ नाथांपैकी एक गहिनीनाथ महाराज यांची संजिवन समाधी स्थळ असणार नाथ चिंचोली येथील देवस्थान गहिनीनाथ गड येथे वामनभाऊ महाराज आले.
गहिनीनाथ गड येथील तत्कालीन महंत यादव बाबा महाराज यांची काही वर्ष सेवा केल्यानंतर वामनभाऊ महाराज यांची गहिनीनाथ गडाच्या महंत पदी निवड झाली. वामनभाऊ महाराज हे आजिवन ब्रम्हचारी संत. वामनभाऊ महाराज महंत पदी निवड झाल्यानंतर समोर असणारी आव्हानं बिकट होती. देश आणि मराठवाडा स्वातंत्र्याच्या टप्प्यात असतांना किर्तनाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्र भर जे का रंजले गांजले तयासी म्हणी जो आपले, तोची साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा त्याप्रमाणे वंचित, पिडित अत्याचारीत लोकांना ज्ञान उपदेश करुन एकत्र करणे, राष्ट्रभाव, भागवत धर्म आणि अन्याय अत्याचाराला न घाबरण्याची उमेद, शक्ती, धैर्य सर्व सामान्य माणसात निर्माण करण्यासाठी आणि अध्यात्माच्या माध्यमातून पापपुण्य, न्याय अन्याय, सदाचार, संस्कार, संस्कृती शिक्षणाचे महत्व आणि मुल्य सर्व सामान्य लोकांना अगदी आपुलकीने गावागावात, वाडीवस्तीवर, जाऊन भाऊंनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून लोकजागृती केली.
देश आणि मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर शिक्षणाचे मुल्य, संस्कार, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती बदलण्यासाठी भाऊंनी आयुष्य वेचले, संत भगवानबाबा व संत वामनभाऊ हे गुरुबंधु, दोघांचे कार्यस्थळ वेगवेगळे होते परंतू विचार आणि ध्येय मार्ग एकच होता. संत वामनभाऊ व भगवान बाबा यांनी एका विचाराने एकोणवीसाव्या शतकात भगवानगड व गहिनीनाथ गड परस्पर विचारातून, सहकार्यातून भव्य अशा गडांची निर्मिती केली आणि महाराष्ट्रातील अठरा पगड जातीधर्मातील लोकांना हक्काचे धर्मपीठ भगवान गड व गहिनीनाथ गड निर्माण केले. दसरा मेळाव्याला भगवान गडावर राज्यभरातून दरवर्षी किमान 10 ते 15 लाख भाविक येतात.
25 जानेवारी 2022 रोजी वामन भाऊ महाराज यांची पुण्यतिथी असल्याने गहिनीनाथ गडावर राज्यभरातून 4 ते 5 लाख भाविक येतात. भगवान गड व गहिनीनाथ गड आज राज्यातील नामांकित तीर्थ क्षेत्र आहेत. संत वामन भाऊ महाराज यांनी गहिनीनाथ गडावरुन चालू केलेली पायी दिंडीची परंपरा आजही अखंडीतपणे चालू आहे. 24 जानेवारी 1976 मध्ये वामनभाऊंनी देह ठेवतांना वैकुंठ गमन करत असतांना संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी दिवशी सुरु होणारा अखंड हरिनाम सप्ताह हा संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी सुरु होणारा अखंड हरिनाम सप्ताह हा संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीदिवशी काल्याचे कीर्तन होऊन सप्ताहाची सांगता होती.
एवढा प्रचंड महा योगायोग महाराष्ट्राच्या संत परंपरेत गुरु बंधू असणारे संत भगवान बाबा व वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीत दिसून येतो. संत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील हजारो गावात अखंड हरिनाम सप्ताह आजही चालू आहेत. महाराष्ट्रा बाहेर देखील आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश सुद्धा पुण्यतिथी खुप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आजच्या समाजाला खरी गरज आहे ती संत भगवानबाबा व संत वामनभाऊ महाराज यांच्या विचारांची एकमेकांची उणी दुणी न काढता, तुझ माझ न करता अहंकार विरहित आपल समजून चालण्याची या महान संताच्या विचाराचे अनुकरण करण्याची नितांत गरज आहे.
संत वामनभाऊ, संत भगवानबाबा यांचे कार्य तेवढेच प्रेरणादायी आहे आणि भविष्यात ही तेवढेच प्रेरणादायी राहील.
संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने कोटी कोटी प्रणाम !!!
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष
वंजारी महासंघ, महाराष्ट्र