
दैनिक चालु वार्ता
पिंपरी प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पुणे :- या बाबत सविस्तर असे की,एमबीसीपीआर संस्थेच्या वतीने भामचंद्र बुद्ध लेणीचा अभ्यास दौरा करण्यात आला.या अभ्यास दौ-यात लेणी विषयावर माहिती देण्यात आली. या अभ्यास दौ-यात सुमारे १६ लेणी संवर्धक उपस्थित होते. भामचंद्र बुद्ध लेणी ही सातवाहन कालीन लेणी असून त्या ठिकाणी ४ लेण्या आहेत व त्या मध्ये १ चैत्यगृह असून त्या चैत्यगृहातील २ स्तूप नष्ट केलेले आहेत. त्या नष्ट केलेल्या स्तूपांचा खालील भाग तोवर चा भाग छत्रावली आपण या चैत्य ग्रहामध्ये आजही पाहू शकतो.
या चैत्यगृहातील बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचे शिल्प नष्ट करण्यात आले आहे तेही आपण त्या ठिकाणी पाहू शकतो, या ४ ही लेण्यांमध्ये अतिक्रमण केलेले आहे. या ठिकाणी ५ पाण्याच्या टाक्या( पोड्या) आहेत. त्यातील २ टाक्या (पोड्या) ब्रेकर च्या साह्याने मोठ्या केल्या आहेत. याच भामचंद्र व भंडारा बुद्ध लेण्यांमध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सतत येत असत. याच बुद्ध धंम्माचा प्रभाव संत तुकाराम महाराज व त्यांच्या अभंगांमध्ये दिसून येतो. या भामचंद्र लेण्यांमध्ये एकही सातवाहन कालीन शिलालेख पाहण्यास मिळत नाही, व याच शिंदे वसुली गावांमधील प्राचीन मंदिरामध्ये माता महामायेचे शिल्प आपण त्या ठिकाणी पाहू शकतो.
या भामचंद्र बुद्ध लेण्या अतिक्रमित असून निसर्गाने नटलेल्या सुंदर अप्रतिम आशा पर्वत रांगेत आहेत. या लेण्यांची माहिती लेणी संवर्धक मनोज गजभार, लेणी संवर्धक जगन शिंदे व लेणी संवर्धक शुद्धोधन बागडे सर यांनी सर्व लेणी संवर्धकांना दिली. या वेळी लेणी संवर्धक आशिष भोसले, रवी कांबळे, महायान मसुरे,अजय तांबे, गिरीश साबळे, कपिल कांबळे, राजेश सरतापे, सिद्धू कांबळे, यश माने, संग्राम भोसले, विजय पडघान, वर्धन कदम, व अभिषेक निकाळजे इत्यादी लेणी संवर्धक या अभ्यास दौऱ्यास उपस्थित होते …