
दैनिक चालु वार्ता
भंडारा प्रतिनिधी
राजेश गेडाम
भंडारा, दि. 24 :- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात 11 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मतदार नोंदणीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधिक्षक वसंत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून आदी मान्यवर उपस्थित राहतील. नुकतेच राबविलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मतदार नोंदणी कार्यक्रमाला यश आले असून 19 हजार 568 मतदारांची यादीत भर पडली असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी कळविले आहे.