
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- जिल्ह्यातील फुलंब्री शहरात फुलंब्री येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाले. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते महाआरती व पूजन करण्यात आले.
जळगाव महामामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती, फुलंब्री येथे प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली.
यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी आमदार कैलास पाटील, समिती अध्यक्ष तथा शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, सभापती चंद्रकांत जाधव, उपसभापती राहुल डकले, राजेंद्र ठोंबरे, माजी नगरसेवक किशोर नागरे, मकरंद कुलकर्णी, नीतीन देशमुख, विजय मोरे, आनंदा डोके, मनोहर बखले, गणेश सोनवणे, आदीसह शिवप्रेमी बांधव व ग्रामस्थ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, फुलंब्री पदाधिकारी उपस्थित होते.