
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी अरुण भोई
राजेगाव :- ग्रामपंचायत राजेगाव कार्यालयामध्ये प्रबोधनकार हिंदुहृदयसम्राट ‘बाळासाहेब ठाकरे’ यांची जयंती साजरी केली. यावेळी शिवसेना वैद्यकीय दौंड तालुका समन्वयक डॉ प्रमोद रधंवे,यांनी माहिती दिली की शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, व शिवसेना नेते युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरण/पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे नगरविकास / सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, व श्रीकांत शिंदे,व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक मंगेश नरसिंह चिवटे, (मूळ संकल्पना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, मदत कक्षाच्या मंत्रालय, मुंबई) यांच्या सुचनेनुसार बाळासाहेब ठाकरे, शिवसेना वैद्यकीय दौंड तालुका समन्वयक प्रमोद रधंवे यांची निवड करण्यात आली.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातुन आपण गोर-गरीब, गरजू आणि अर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात ( १०% + १०% ) राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर राहून आपन कार्य करणार असल्याचे रणदिवे यांनी सांगितले.गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोर-गरीब, गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी श्री. सिध्दिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्ट च्या माध्यमातुन मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना भवन येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधावा.
यावेळी राजेगाव ग्राम पंचायतचे सरपंच प्रवीण लोंढे, माजी सरपंच मालोजी मोरे, युवा नेते मुकेश गुणवरे, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश राऊत, ग्रामपंचायत सदस्य सोपान चोपडे,गणेश जाधव, महेश कडू, माजी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद मोरे, सुनील शेंडगे, सोसायटी सदस्य शहाजी गुणवरे, बाळासाहेब दळवी, मुकेश मोरे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.