
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
1) राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 28 फेब्रुवारी
2) राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 जानेवारी
3) राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर
4) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?
उत्तर : नायट्रोजन
5) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
उत्तर : सूर्य
6) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर : न्यूटन
7) सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?
उत्तर : 8 मिनिटे 20 सेकंद
8) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
उत्तर : टंगस्टन
9) डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?
उत्तर : मूत्रपिंडाचे आजार
10) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?
उत्तर : पांढऱ्या पेशी
11) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे?
उत्तर : 1 मे 1960
12) महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे?
उत्तर : 1 मे 1962
13 ) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत?
उत्तर : यशवंतराव चव्हाण
14) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?
उत्तर : श्री प्रकाश
15) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?
उत्तर : – 3,07,713 चौ.कि.मी.
16) महाराष्ट्राचा विस्तार किती आहे?
उत्तर : अक्षांश 15 अंश 8′ उत्तर ते 22 अंश 1 उत्तर, रेखांश 72 अंश 6′ पूर्व ते 80 अंश 9′ पूर्व. पूर्व-पश्चिम विस्तार 800 कि.मी. उत्तर-दक्षिण विस्तार 700 कि.मी.
17) महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे?
उत्तर : 720 किमी
18) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
उत्तर : मुंबई
19) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?
उत्तर : नागपूर
20) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते आहे?
उत्तर : कळसुबाई (1646 मी.)