
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- नांदेड – लातूर या राष्ट्रीय महामार्गावरील व गंगाखेड – कंधार – नांदेड – लातूर या चौ रस्त्यावर असलेले लोहा शहर तालुक्याचे ठिकाण असून लोहा शहरात “क “वर्गांची नगर परिषद आहे व या नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली लोहा शहरात विविध विकास कामांची घौडदौड चालू आहे आहे त्यामुळे लोहयाची जनता म्हणते नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी वन्स मोअर.
नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांचा जन्म लोहयातील अतिशय श्रीमंत व प्रतिष्ठित सुर्यवंशी परीवारात झाला नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचे काका लोहा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी आहेत. गजानन सावकार सुर्यवंशी हे त्यांचे काका कल्याण सावकार सुर्यवंशी यांच्या बोटाला धरून राजकारणात आले. त्यांचे सुर्यवंशी घराणे लोहा शहरातील प्रतिष्ठित घराणे असुन ते सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय व धार्मिक क्षेत्रात सदा अग्रेसर आहे गोरगरीब जनतेला ते सदा मदत करीत राहतात.
नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी सुर्यवंशी हे त्यांचे काका माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी यांच्या प्रमाणे लोहा न.पा.चे नगरसेवक, उपनगराध्यक्ष व नंतर नगराध्यक्ष असे तिन्ही पदे भूषविणारे काका – पुतणे ठरले आहेत. २०१८ ला लोहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली झाल्या यावेळी नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडण्यात आले लोहा शहरांच्या जनतेने नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी सुर्यवंशी यांना भरघोस मतांनी निवडून दिले तसेच त्यांच्या सोबत भाजपाचे १३ नगरसेवक ही निवडून दिले.
त्यावेळेसचे तात्कालीन आमदार व सध्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गजानन सुर्यवंशी यांना भाजपाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी दिली व नगराध्यक्ष पदाचा त्यांनी योग्य उमेदवार दिल्याने गजानन सुर्यवंशी यांच्या सोबत १३ जण भाजपाचे नगरसेवक निवडून आले व विरोधी पक्षाचे काँग्रेसचे ४ नगरसेवक निवडून आले. लोहा न.पा.ची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर २०१८ मध्ये झाली व डिसेंबर २०१८ मध्ये गजानन सावकार सुर्यवंशी यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला व कामकाज करण्यास सुरुवात केली.
लोहा नगरीच्या जनतेने गजानन सावकार सुर्यवंशी यांना लोहा नगरीचे नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली त्या संधिचे सोने नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी करून लोहा शहरात विविध विकास कामांचा सपाटा लावला आहे. लोहा शहरातील जनतेला विश्वासात घेऊन लोहा शहरात फेरफटका मारून कुठं काय कामे करायची आहेत हे जनतेच्या मागणीनुसार सभागृहातील सर्व नगरसेवकांशी चर्चा करून प्रभाग निहाय विविध विकास कामे सुरू केले यात दलित वस्तीत इंदिरानगर, डॉ.आंबेडकर नगर, कलाल पेठ या ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून अनेक विंधन विहिरी पाडल्या तसेच सौर ऊर्जेचे शेकडो पोल लाऊन प्रकाशाचा लखलखाट केला.
लाईट गेल्यानंतर ही या सौर ऊर्जेचे दिव्यांचा प्रकाश मोठ्या प्रमाणात पडत आहेत प्रत्येक नागरिकाच्या घरासमोर सौर ऊर्जेचे पोल बसविण्यात आले आहेत त्यामुळे नागरिकां मध्ये समाधान व्यक्त होत आहे तसेच या दलित वस्तीत सिमेंट रस्ते, सिमेंट नाल्यांची बांधकामे मोठ्या प्रमाणात झाले आहेत तसेच खुल्या प्रभागात ही अनेक ठिकाणी विकासाचे कामे झाली आहेत अनेक ठिकाणी विकास कामे चालू आहेत.यात सायाळ रोड, मुक्ताई नगर, गंगाराम नगर, प्रिय दर्शनी नगर, पोस्टाच्या पाठीमागे, मोमीन गल्ली, शिव कल्याण नगर, शिक्षक काँलनी, खंडोबा नगर, जुना लोहा, लिंबोनी गल्ली, मोंढा एरिया , आदी ठिकाणी सिमेंट रस्ते नाली बांधकाम झाले आहेत.
लोहा शहरात स्वच्छतेचे साफ सफाई चे कामे, दिवा बती , पाणीपुरवठा, रस्ते आदी कामे अतिशय चांगली होत आहेत तसेच लोहा शहरातील प्रधान मंत्री घरकुल योजनेचे अनेक कामे चालू असुन लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येत आहे त्यांचे बीले काढण्यात येत आहेत त्यामुळे नागरिकांना मध्ये समाधान व्यक्त होत आहे.
तसेच लोहा शहरात नांदेड – लातूर या राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण वाढले असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानी समोर व भाजी मंडई जवळ रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याने ट्रक अपघात एका सेवानिवृत्त शिक्षकांचा अपघातात मृत्यू झाला होता.
त्यानंतर पुन्हा असे अपघात होऊ नये मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ न.पा.ने काढावेत अशी मागणी जनतेतून होत होती तेव्हा कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी लोहा शहरातील अतिक्रमण काढण्याचा धाडसी निर्णय घेऊन लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरील वाढलेले अतिक्रमण जमिनदोस्त केले त्यामुळे या मुख्य रस्त्याने सुटकेचा निःश्वास सोडला व नागरिकांना दळणवळणासाठी रस्ता मोकळा झाला. तसेच मागच्या महिन्यात लोहा शहरात चोरीच्या लुटमारी च्या अनेक घटना घडल्या होत्या त्यामुळे लोहा शहरात पोलीसांच्या मदतीसाठी चोरांना पकडण्यासाठी चोरीच्या घटनेला पावबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी जनतेतून होत होती.
तेव्हा नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी जनतेच्या रक्षणासाठी गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी लोहा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेत यामुळे लोहा शहरातील चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
तसेच लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र चे आराध्य दैवत रयतेचे राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व्हावा अशी अनेक वर्षांची जनतेची मागणी होती व लोहा न.पा. च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी नुकतेच दि.१६ जानेवारी २०२२ रोजी बळीराजा मार्केटने दिलेल्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या चबुतऱ्याचे काम सुरू केले आहे.
लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा येथे न.पा. च्या वतीने बसविण्यात येणार आहे व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी आहेत व त्यांनी त्यांचे नेते खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपनगराध्यक्ष व सर्व सन्माननीय नगरसेवक यांना विश्वासात घेऊन मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा ही पाहिला आहे व त्या एजनसीला न.पा. च्या वतीने ५ लाख रुपये ॲडव्हान्स दिले आहेत .
त्यामुळे लवकरच लोहाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. तसेच लोहा शहरातील मुस्लिम समाज बांधवांसाठी शादीखाना , बौद्ध समाज बांधवांसाठी बुद्ध विहार, यांचे ही कामे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी मंजूर केले आहेत. तसेच लोहा शहराला कायम स्वरुपी पाणीपुरवठा करण्यासाठी लोहा शहर वासियांची तहान भागवण्यासाठी लिंबोटी धरणातून थेट पाईप लाईन करून माळावरील टाकीत मोडण्याचे काम ही हाती घेतले आहे.
असे अनेक विकास कामे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी हे करीत असुन बारामती ची ओळख जसे राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा. शरद पवार, नांदेडची ओळख बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण, यांच्या नावाने आहे त्याप्रमाणे लोहा शहराची ओळख नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या नावाने होत आहे आणखी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा कार्यकाळ जवळपास दोन वर्षांचा बाकी आहे त्यांनी तीन वर्षांत लोहा शहरात मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे केली आहेत. तसेच आणखी काही विकास कामे प्रस्तावित आहे सध्या ते ओबीसी प्रवर्गातून नगराध्यक्ष पदी निवडून आले आहेत व कामकाज अतिशय उत्कृष्ट करीत आहेत.
आणखी दोन वर्षांनंतर लोहा न.पा.ची सार्वत्रिक निवडणूक आहे . नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गाला सुटले किंवा ओबीसी ला सुटले तर पुन्हा लोहा न.पा. च्या नगराध्यक्ष पदी गजानन सावकार सुर्यवंशी हेच व्हावेत अशी लोहा शहरातील जनतेची इच्छा आहे त्यामुळे जनतेतून चर्चा आहे लोहा शहरात लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली लोहा न.पा.ची विकासाची घौडदौड लोहयाची जनता म्हणते नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी वन्स मोअर.
आज दिनांक २६ जानेवारी रोजी लोहा शहराचे लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांचा वाढदिवस आहे ईश्वर त्यांना चांगले निरोगी आरोग्य देवो त्यांच्या हातून नियमित जनसेवा घडो व पुन्हा ते लोहा न.पा.चे नगराध्यक्ष होवो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा
विलास सावळे
लोहा