
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी आर्णी
श्री.रमेश राठोड
आर्णी :- आर्णी तालुक्यातील मौजा माळेगांव येथिल सुप्रसिद्ध गायक सुनिल चव्हाण समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे समाजात दिवसेंदिवस समाजामध्ये हुंडा घेण्याचे प्रमाण वाढत असताना माळेगाव ता. आर्णी येथील सुप्रसिद्ध गायक सुनिल रामचंद्र चव्हाण यांनी आपल्या मुलासाठी एका आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची गरीब कुटुंबातील मुलगी एक पैसा ही हूंडा न घेता आपल्या परीवाराची सुन म्हणून स्वीकारली त्या बद्दल सुनिल चव्हाण यांचे समाजामध्ये सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
नेमकाच त्यांच्या मुलाचा साक्षगंध सोहळा पार पडला असुन लवकर च ते लग्न गाठीत बांधल्या जाणार आहे. सुनिल चव्हाण यांनी केलेल्या कार्याचा आदर्श ईतर सर्वच समाजाने घ्यावा असे मत पत्रकार राम पवार यांनी व्यक्त केले. या पुर्वी ही सुनिल चव्हाण यांनी एका अनाथ मुलीचे लग्न लावून कन्यादान केले .सुनिल चव्हाण यांना विचारले असता सर्वात मोठा हुंडा आमच्या सुनबाई आहे असे ते म्हणाले.