
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
जोमेगांव :- येथील सामाजिक कार्यकर्ते भास्करराव पा. जोमेगावकर यांनी नांदेड येथे अप्पर जिल्हा दंडाधिकारी नांदेड प्रदिप कुलकर्णी यांच्यामार्फत मा. श्री. उध्दवरावजी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा. स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गास जोडूघातलेल्या नांदेड – जालना समृद्धी महामार्गाला मा. स्व. डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सरचिटणीस नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी मा. मुख्यमंत्री साहेब व सार्वजनिक बांधकाममंत्री मा. श्री. अशोकराव चव्हाण साहेब यांच्याकडे मागणी केली आहे.