
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- संपुर्ण नांदेड जिल्हात अत्यंत शांत,सुस्भावी, संयमी, निगर्वी, कुबेरी घरानेम्हणून सुर्यवंशी सावकार घराण्याकडे संपूर्ण समाजातून बघीतले जाते या घराण्यात विश्वनाथ सावकार, नारायण सावकार,माणिक सावकार यांच्या कुंटुंबात जन्मास आलेले दशरथ सावकार,कल्याण सावकार,राम सावकार,सुभाष सावकार, गंगाधर सावकार,धनराज सावकार व तिस-या पिडीत गजानन सावकार सुर्यवंशी या कुबेरी घराण्यातील राज बिडें वंशज आहेत.
सुर्यवंशी घराण्याच्या पुर्व इतीहास सुसंस्कृत निगर्वी, निर्भिड,संयमी व दानत वृत्तीचा असल्या मुळे सर्व समाजातील लोक त्यांच्या घराण्यावर प्रेम करतात.त्यांच्या तिन पिडयातील पुर्वजांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य् देवून जास्त् प्रमाणात समाजकारण केले असून गोर-गरीब ,शोषीत पिडीत दलीत कष्टकरी कामगार वर्गाच्या सुखा-दु:खात सहभाग घेवून सर्व सामान्यला आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नारायण सावकार,विश्वनाथ सावकार, गोविंद सावकार,माणिक सावकार,या चार संयमी बांधवाणी स्वतंत्र पुर्वकाळात गोरगरीब दिन दलीतांना रोजगार कसा उपलब्घ् होईल यासाठी प्रयत्न करून त्यांच्या सुखात दु:खात सहभागी होवून धिर देण्याचे काम केले आहे तसेच लोहा तालुक्यात गरीबांना काम मिळावे म्हणून जिनीग प्रेसीगचे कारखाना उभारून गोर-गरीब जनतेला रोजगार मिळूण देवून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न् त्याकाळी मिटवीला आहे.
त्याचारही बांधवाचे बंधु प्रेम आजही कंधार-लोहा तालुक्यात आदर्शवंत मानले जाते आणि आज मितीस त्यांचेच वंशज याकाळात कधीच चुलत बंधू म्हणून वावरंत नाहीत हे विशेष आज घडीस दशरथ सावकार,सुभाष सावकार,कल्याण सावकार,राम सावकार,गंगाधर सावकार,धनराज सावकार,हे सर्व जण एकमेकांना विश्वासात घेवूनच राजकीय व सामाजीक निर्णय एकत्रीतपणे घेतात ही सुर्यवंशी घराण्याची विशेष खाशीयत आहे.
सुर्यवंशी कुंटुंब एकत्री आहे कि वेगळे आहे असे लोहा शहरासह पंचक्रोशीतील कोणीही सांगु शकत नाही कारण त्यांच्या मालमत्तेच्या वाटण्या कधी आणि कोठे झाल्या हे त्यांच्या कुंटुंबाशिवाय कोणालापण माहिती नाही अशा या संयमी घराण्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी केंद्रीय मंत्री डॉ.शंकरराव चव्हाण साहेब यांच्या घराण्याशी अत्यंत जवळचे आणि जिवाळयाचे संबंध आहेत.त्यामुळे राजकारणात कल्याण सावकार सुर्यवंशी या संयमी नेतृवाचा राजकारणात उदय झाला.
ते लोहा नगरपालीकेचे प्रथम उपनगराध्यक्ष नंतरच्या काळात नगराध्यक्ष पद भुषविले आहे.तसेच त्यांच्या कुंटुंबातील राम सावकार सुर्यवंशी यांनी उपनराध्यक्ष पद भुषविले आहे.त्यांच्या कुंटुंबातील तिस-या पिडीत जन्माला आलेले राज बिंडे युवा नेते गजानन सावकार सुर्यवंशी यांनी ही त्यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात जेष्ठ समाजसुधारक दशरथ सावकार सुर्यवंशी कॉग्रेसचे जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष राम सावकार सुर्यवंशी सामाजिक कार्यकत्ते गंगाधर सावकार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करून काही काळ राज्याचे माजी मुख्यंमंत्री अशोकराव चव्हाण त्यावेळचे कॉग्रेसचे नेते विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली काम करून लोहा नगरपालीकेच्या राजकारणात सहभाग घेवून यशस्वीरित्या नगरसेवक,उपनगराध्यक्ष,नगराध्यक्ष असे पद भुषविले असून आजमितीस ते लोहा नगरीचे लोकप्रय,लोकनियुक्त् क्रर्तवेदक्ष नगराध्यक्ष म्हणून विराजमाण आहेत.
गजानन सुभाषराव सुर्यवंशी त्यांच्या संपूर्ण घराण्याला नांदेड जिल्हात व आजुबाजुच्या परिसरात सावकार म्हणून संबोधले जाते परंतु सुर्यवंशी घराण्याच्या तिन पिडयात व्यवसायीक स्वरूपात आपला जम बसवीला आहे.त्याकुंटुंबात कोणीही व्याज बटयाचा व्यवसाय केलेला नाही.किंवा तसे कुठे बोलेले पण जात नाही त्यांच्या सामाजीक वृत्तीमुळे लोहा कंधारच्या सर्व सामान्य् जनतेकडून सावकार ही प्रेमाची उपाधी त्यांना मिळाली आहे.
सुर्यवंशी घराणे हे जर पुर्वजापासूनच राजकारणाशी निगडीत असते तर लोहा-कंधार विधानसभा मतदार संघात कल्याण सावकार हे आमदार म्हणून विधानसभेत 1980 सालीच गेलेअसते परंतु सुर्यवंशी घराण्याने दुस-या व तिस-या पिडीत देखील 80% समाजकारण व 20% राजकारण करून स्थानिक राजकारणातच रमले आहे त्यांचे कारण असे कि सुर्यवंशी घराण्यात कोणालाही राजकारणातून काळी कमई करण्याची गरज नाही किंवा ते त्यासाठी राजकारण करीत नाहीत अशी गोर-गरीब जनतेची सेवा करता यावी यासाठीच ते राजकाणात सहभागी असतात अशी धारणा गोर-गरीब जनतेत आहे.
सुर्यवंशी घराण्याची लोकप्रियता लोहा शहरासह कंधार-लोहा तालुक्यात सर्व धर्मातील लोकामध्ये व युवकामध्ये असल्यामुळे लोहा नगरपालीका निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रभागात सुर्यवंशी घराण्यातील व्यक्ती समाजसेवेच्या जोरावर सहज पणे विजय प्राप्त करतात हा त्यांच्या कुंटुंबाचा यशस्वीतेचा पायंडा आहे.सध्या कल्याण सावकार सुर्यवंशी हे माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या खांदाला खांदा लावुन राजकारणात सक्रीय आहेत तर नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी हे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सोबत सक्रीय असले तरी हे दोद्ये काका-पुतणे कोठेही सक्रीय असले तरी दो जिसम एक जान हे हम असाच त्यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास सूरू आहे.
लोकनिुयक्त् नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या काळातील गेल्या दोन वर्षापासून करोना या महामारीने लोहा शहरात कहर गेला होता परंतु आत्यंत खबंरी पणे गजानन सावकार यांनी लोहा शहर व तालुक्यातील सर्व व्यापारी सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे शहरातील सर्वसामान्य् नागरीक पत्रकार मंडळी यांना विश्वासात घेवून लोहा तालुक्यात वेळोवेळी टाळेबंदीचे निर्णय घेवून कोरोना या महामारीला रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
कोरोनांच्या दुस-या महाभयकर लाटेमध्ये तर रात्रदिवस उपाययोजना करून तत्कालीन मुख्याधिकारी व्यापारी संघटना पोलिस निरीक्षक भागवत जायेभाये ,तत्काळीन तहसिलदार विठल् परळीकर,नायब तहसिलदार राम बोरगावकर,नायब तहसिलदार मोकले,गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे यांना सोबत घेवून महामारीस रोखण्यास अटोकाट प्रयत्न केला आहे आणि आजही या महामारीस रोखण्यासाठी नगरपालीकेची कर्तव्य्दष कर्मचारी तहसिलदार मुंडे,गटविकास अधिकारी व्हावळे, पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्याशी वेळोवेळी चर्चाकरून महामारीला रोखण्याचा सुचना करून महामारी कसे हदपार करता येईल यासाठी कसोसीने प्रयत्नशील असतात.
तसेच लोहा शहरात हिंदवी स्वराज्याचे स्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवरायाचा पुतळा व्हावा यासाठी गजानन सावकार सुर्यवंशी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशिल होते त्यांनी तथकालीन अमदार व विद्यमान खासदार प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासन दरबारी वेळोवेळी पुतळयासाठी पाठपुरावा करून अखेर लोहयांच्या छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळयांच्या जागेचे औपचारीक उदघाटन खा.प्रतापराव चिखलीकर यांच्या हस्ते करून घेतले असून त्यांनी लोहा नगरपालीकेच्या निवडणूकीत नागरीकांना दिलेल्या आश्वसनाची पुरतता केली आहे.
छत्रपती शिवरायांचा आश्वारूढ पुतळयांचे काम लवकरात लवकर करून लोहा शहरातील पुतळा हा संपूर्ण देशात भव्य् दिव्य् स्वरूपाचा असावा असा त्यांचा मानस आहे.गजानन सुर्यवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयांचे काम मनावर घेवून केल्यामुळे लोहा शहरासह तालुक्यात त्यांच्या कौतुकास्प्द कामगिरीबदल युवकांत व सर्व सामान्य् नागरीकामध्ये कामाची पुर्तता करणारा नेता म्हणून प्रतिमा निर्माण झालेली आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर समस्या गेल्या अनेक वर्षापासून लोहा शहराला भेडसावत होती त्यावर तोडगा काढण्यासाठी शहरातील सर्व नगरसेवक नगर पालिका प्रशसनातील अधिकारी यांना सोबत घेवून सुनेगाव येथील तलावातील पाईपलाईनीव्दारे पाणीपुरवठांचा प्रश्न् कायमचा निकाली काढला आहे.
तसेच शहरातील विकासाच्या कामासाठी सर्व नगरसेवक,प्रशासनातील अधिकारी यांना विश्वासात घेवून विकास कामाना गती देतात मार्केट यार्ड परीसरात पुर्ण सिमेंट कॉक्रेटचे रस्ते,दुभाजका मध्ये वृक्षारोपण,पथदिवे याकामावर विशेष लक्ष्यदेवून नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी हे काम करून घेतात विशेष लक्ष्णीय बाब असल्याचे शहरातील नागरीकामध्ये चर्चा होत असतांना दिसत आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात लोहा शहरातील दलीत वस्तीत वावरणा-या नागरीकांना स्वाभीमानाने जिवन जगता यावे यासाठी दलीत वस्ती योजने अंतर्गत शासनाकडून मिळणारा निधी त्यांच वार्डात पुर्णपणे खर्च करून डॉ.आंबेडकर नगर,भैय्यसाहेब अंबेडकर नगर,गायकवाड नगर,इंद्रानगर,जुन्या लोहयातील दलीत वस्ती प्रभागात,मुलभुत सुविधेसह पायाभुत सुविधा त्यामध्ये विज,पाणी,रस्ते ,घरकुल,नाल्या इत्यादी कामांना प्राधान्य् देवून नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी केलेली कामे जनहिताची मानली जातात.
तसेच लोहा शहरात वाहतूकीची समस्या फार मोठया प्रमाणात निर्माण झाली होती त्यावर गजानन सुर्यवंशी यांनी शहरातील व्यापारी,फेरीवाले शहरातील सर्व सामान्य् नागरीक राजकीय सामाजीक क्षेत्रात कार्यकरणारे,प्रशासनातील अधिकारी यासर्वाना विश्वासात घेवून लोहा शहरातील रस्तच्या कडेला व रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटविण्याचा सर्वाच्या मदतीने धाडसी निर्णय घेवून लोहा शहरातील वाहतुकीचा प्रश्न् कायमचा निकाली काढल्यामुळे शहरातील सर्व सामान्य् नागरीक निर्भीडपणे मुक्त् संचार करताना दिसत आहेत.
लोहा शहरात शिवरायाच्या अश्वारूढ पुतळया बरोबरच भारतीय घटनेच शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ही पुतळा शहरात डॉ.आंबेडकर भागात उभारण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांनी पुढाकार घेवून बाबासाहेबांचा पुतळा ताबडतोब उभारण्यास प्रयत्न करून दोन्ही महापुरूषांचे पुतळे आपल्याच काळात उभेकरून लोहा शहराच्या वैभवात भर टाकण्याचे महान कार्य गजानन सावकाराकडून ताबडतोब व्हावे अशी शिवप्रेमी व भिमप्रेमी नागरीकाकडून अपेक्षा होत आहेत.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून भारत देशात सण म्हणून साजरा केला जातो तर लोहा शहरात गजानन सावकार सुर्यवंशी यांचा वाढदिवस देखील शहरातील सर्वधर्मातील लोक व सामाजीक,राजकीय,शैक्षणिक, सांस्कृतीक,पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवर मंडळी गजानन सावकार सुर्यवंशी यांचा वाढदिवस स्वयंस्फुर्तीने सण म्हणून साजरा करतात अशा या कर्मयोगी दिन दलीत कष्टकरी कामगार यांच्या विकासासाठी प्रयत्नशिल असलेल्या राजकारणातील व समाजकारणात धुव्रतारा-याप्रमाणे चमकणारे लोकनियुक्त् नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या राजकीय व सामाजिक जिवनात उत्तरोतर प्रगती होवो व त्यांना व त्यांच्या कुंटुंबांना निरोगी व उदंड आरोग्य्सह दिर्घ आयुष्य् लाभो हि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !