
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे.
देगलूर :- धर्माबाद येथील पायोनिअर डिस्ट्रलरी कंपनीची राज्य उत्पादन शुल्क भरलेला दारू अवैध विक्रीच्या उद्देशाने इतरत्र साठवुन नंतर तुळजापुर येथे अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला होता. याप्रकरणी आतापर्यंत तुळजापुर, हिंगोली जिल्ह्यातील हट्टा, नांदेड जिल्ह्यातील देगलुर, मुखेड ठाण्याच्या हद्दीत सुमारे २० लाख ५५ हजाराचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे
धर्माबाद येथिल पायोनीअर डिस्टीलरी येथून उत्पादन शुल्क भरलेले एक हजार १०० बॉक्स घेऊन वाहनाने अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने इतर ठिकाणी साठविण्यासाठी पाठविण्यात आले होते.
त्यानंतर सदर वाहनाचा तुळजापुर येथे अपघात झाल्याची बतावनी करण्यात आली होती. त्यात १ हजार १०० बॉक्स पैकी ४१५ बॉक्स तुळजापुर पोलिसांनी जप्त केले तर ३३ बॉक्स हिंगोली जिल्ह्यातील हट्टा पोलिसांनी जप्त केले. उर्वरित २६२ बॉक्स देगलूर व मुखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये एकुण २० लाख ५५ हजार ९४० रूपयांचा दारूसाठी जप्त केला. याप्रकरणी नांदेड जिल्हा गुन्हे अन्वेशन विभागा मार्फत या घटनेचा तपास सुरु असून अन्य काही ठिकाणी सदर कंपनीने दारुसाठा विक्रीच्या उद्देशाने केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची चौकशी सुरु आहे.
याप्रकरणी आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर कंपनीचे यापुर्वी देखिल अनेकवेळा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आजरोजी या प्रकरणात बालाजी अनिल हिमगीरे वय २४ रा. एकलारा ता. मुखेड, दिपक अनिल हिमगीरे वय २१ रा. एकलारा व इरशेद मोहम्मद शेख वय २१ रा. तमलुर ता.देगलूर या तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, या तिनही आरोपींना तीन दिवसाची एक्साईज कस्टडी देण्यात आली आहे.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शूल्क देगलुर विभागाचे निरीक्षक ए.एम.पठाण, दुय्यम निरीक्षक रामलिंग सुर्यवंशी, शिवाजी कोरनुळे, उज्जवल सदावर्ते, वाहन चालक फाजिल खतिब, यांनी पार पाडली. तसेच सदर कारवाई करीता दुय्यम निरीक्षक राजकि रण सोनावणे, दु.नि.हरी पाकलवाड, ए.जी.शिंदे, मो.रफी, बालाजी पवार, विकास नागमवाड, परमेश्वर नांदूसेकर, आर.ब.ी फाळके, शिवदास नंदगावे, दिलीप जाधव यांनी मदत केली.