
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नांदेड :- शहिद जवान बालाजी श्रीराम डुबूकवाड यांच्या स्मरणार्थ प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भव्य महारक्तदान शिबीर_ आयोजित करण्यात आले आहे. जय भोईराज युवा गर्जना फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य शाखा नांदेड यांच्या तर्फे सर्वाना कळविण्यात येते की, दिनांक २६/०१/२०२२ रोज बुधवार सकाळी ११:०० ते सायंकाळी ५ :०० वाजेपर्यंत भव्य महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबीरात नवयुवकांनी व देशप्रेमीनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
जय भोईराज युवा गर्जना फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बालाजी अडगुलवार, राजू मामुलवार, जगदिश कोटगीरे, सचिन जमदाडे, संतोष निलमवार, सुनील निलेवार, अंकुश डुबूकवाड,शंकर खंडागळे, दशरथ लोणारे, अनिल बत्तलवाड, आहीलाजी पंदिलवाड, संतोष पंदिलवाड, माधव गधंलपवाड, पवन मरेवाड व समस्त भोई बांधवानी व देशप्रेमी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान शिबीरास चांगला प्रतिसाद द्यावे अशी विनंती करण्यात येत आहे. रक्तदान शिबीराचे ठिकाण :- मुथा चौक, हनुमान पेठ, वजिराबाद चौरस्ता , नांदेड. वेळ :- ११:०० ते ५ :००