
दैनिक चालु वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
उदगीर :- महाराष्ट्राचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते वैक्सीन ओन व्हील्स या फिरत्या लसिकरण युनिटचे उद्घाटन करण्यात आले. जिवीका हेल्थकेअर द्वारा संचलीत या युनिटने प्रशासकीय यंत्रणेच्या सहाय्याने सर्व तालुक्यांमध्ये लसिकरणाचे उद्दीष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी गाव तांडा वस्ती घरोघरी जाऊन नागरिकांचे लसिकरण केले आहे.
वैक्सीन ओन व्हील्सच्या टिमकडून होत असलेल्या कामाचे यावेळी ना.बनसोडे यांनी कौतुक केले. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रा.शिवाजी मुळे, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी निटुरे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मा बसवराज पाटिल नागराळकर,शहराध्यक्ष समीर भाई शेख ,कृ उ.बा.स.सभापती सिद्धेश्वर पाटिल, संघशक्ती बलांडे,बाळु सगर,प्रदीप जोंधळे,राहुल सोनवणे शंकर मुक्कावार व इतर मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी या युनीटच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री घाळे, कॉर्डीनेटर भगवान पांचाळ, वैक्सिनेटर्स कु. पुजा कांबळे व रोशन शेख,कम्युनिटी मोबिलायजर अनिल कानगुले, हेल्थकेअर असिस्टंट्स दत्ता सुर्यवंशी, दत्ता लासोणे, मुळे मामा आदी उपस्थित होते.