
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
‘एक पाऊल। सत्याच्या शोधात’
साथ तुमची । काम आमचं ।। या स्फूर्तीदायक वाक्याने या पेपरची गुणवत्ता कळून येते, म्हणून ‘गुन्हेगाराला शिक्षा ,सज्जनाला न्याय’
याप्रमाणे सत्याची कास धरणारे समाजातील विस्कटलेल्या लोकांना एकत्रित आणणारे व बुरसटलेल्या विचारांना बाजूला सारून आधुनिक तेची कास धरणारे मानवतावादी आणि समतावादी कार्य समाजापुढे मांडणारे अल्पावधीत लोकप्रिय झालेले डिजिटल वृत्तपत्र म्हणजेच दै चालू वार्ता होय.
या वृत्तपत्रातून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक माहिती मिळते, तसेच वाचनीय लेख,औषधी वनस्पती जनरल नॉलेज, सोन्या चांदीचे भाव, सूर्यास्त,तापमान, मुलाखती अशा अनेक चालू घडामोडी वर भाष्य करणारे व ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या शासन दरबारी मांडण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम करीत आहेत, मुलाखती च्या माध्यमातून समाजातील तळागाळापर्यंत असणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक केली जात आहे, म्हणूनच अल्पावधीतच हा अंक लोकांना मोहिनी घातला आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी दैनिक चालू वार्ताचा अंक प्रत्यक्ष वाचकांना वाचन करण्यासाठी मिळणार आहे त्याची उत्सुकता सर्व वाचकांना लागलेली आहे म्हणून समाज प्रबोधना बरोबर ज्ञान प्रसाराचे कार्य करणारे मराठवाड्यातील एकमेव दैनिक म्हणजेच दै चालू वार्ता होय यात शंका नाही. दैनिक चालू वार्ताचे मुख्य संपादक मा.डि. एस.लोखंडे पाटील तसेच कार्यकारी संपादक व कंधारचे संवेदनशील तालुका प्रतिनिधी श्री माधव गोटमवाड या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो.
विठूमाऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठान खैरकावाडी,ता.मुखेड जि.नांदेड
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
भ्रमणध्वनी .99 2120 85 63