
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली आहे , अखंड परिश्रमातून भारतीय संविधान तयार करण्यात आले आहे . भारतीय संविधान एक पुस्तक नसून भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे’. कष्टकरी , शेतकरी , कंपनी कामगार , पीडित महिला यांच्या न्याय हक्कासाठी असणारे अवजार आहे . पूर्ण देशाचा कारभार सूचिबद्ध चालण्यासाठी एक महान ग्रंथ तयार करण्याकरिता अनेक समित्या नेमून देण्यात आल्या होत्या त्यात मसुदा समिती चे कार्य खूप महत्वाचे होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधानाचा मसुदा तयार करण्याकरीता 29 ऑगस्ट 1947 या दिवशी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती अहोरात्र अभ्यास करून संविधानाचा मसुदा आणि तत्वे तयार करण्यात आली .
भारताच्या संविधानाला संविधान समितीव्दारे तयार करण्यात आले होते. हे संविधान तयार करण्याकरीता तब्बल 2 वर्ष, 11 महीने और 18 दिवसाचा कालावधी लागला होता. .आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 ला आपला देश संविधान स्विकृत केल्यानंतर एक लोकतांत्रिक सार्वभौमिक, धर्मनिरपेक्ष, समाजवादी,आणि गणराज्य बनला हे मला अभिमानाने सांगावेसे वाटेल आपल्या देशात सर्व भारतीय संविधानानुसार कार्य चालते इथे भाषा विचार प्रगटीकरणाचे स्वातंत्र्य आहे भारत देश असा एकमेव देश आहे आपल्या देशामध्ये सर्व धर्मांचा आदर केला जातो.
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस आपल्या देशातील अनमोल क्षण आहे.
आजच्या या २१ व्या युगामध्ये भारत देशाची गणना शक्तिशाली देशांमध्ये करण्यात येते. प्रजासत्ताक दिनाच्या या औचित्याने आपण एकमेकांना शुभेच्छा देऊया सर्वजण जात धर्म पंथ पक्ष वर्ग हे सारे भेद विसरून फक्त भारतीय होऊया व आपल्या राष्ट्राच्या विकासाकरता आणि समृध्दीकरता आपण स्वतः पासून सुरुवात करूया कि मी माझ्या देशासाठी चांगल्या पद्धतीने काम करेल , मला जे जमेल मी तिथे माझ्या देशासाठी वेळ देईल अशी या दिवशी शपथ घेऊया नक्कीच आपण सर्व भारतीय बांधव आपल्या देशाला विश्वातील सर्वश्रेष्ठ देश बनवण्यात यशस्वी होऊ.
उठ भारतीय तरुणा तू आता अज्ञानातून जागा हो !!
भारत उन्नोती साठी
लोकशाहीच्या
विचाराचा धागा हो !!!!
! जय हिंद ! ! ! !
:-दत्ता विष्णू खुळे जालना
{ युवा कवी लेखक तथा वक्ता }