
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
नांदेड दिनांक 25 जानेवारी :- मतदार जागृती अभियान निमित्त घेतलेल्या विविध स्पर्धेमध्ये श्री निकेतन हायस्कूलची 10 वी (ब) ची विद्यार्थ्यींनी कु.अंकिता तात्याराव इंगोले हीचा जिल्ह्यांतून द्वितीय क्रमांक आला. तिचा सत्कार निवासी उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग) मा सौ मोतीयळे मॅडम यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. आल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री यशवंत थोरात सर सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.