
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- आज शहरातील रस्ते अपघात व वैद्यकीय मदत करण्यात सदैव त्तपर व अग्रेसर असलेल्या ” हेल्प रायडर्स् ” या ग्रुपने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे .” प्रयत्न हेल्प रायडर्स् चा , संकल्प सुरक्षिततेचा ” ही विशेष जनजागृती मोहीम अंतर्गत २६ जानेवारी रोजी शहरातील अत्यंत मुख्य व वर्दळीचा मानला जाणाऱ्या जालना रोड वरील सर्व प्रमुख चौकांन मध्ये सकाळी १०.०० वाजता . म्हणजेच बाबा पेट्रोल पंप ते केंब्रीज चौका पर्यंत ” हेल्प रायडर्स् ” चे सर्व समन्वयक हे जनजागृती मोहीम राबवणार आहेत .
या मध्ये वाढते रस्ते अपघात , अपघात ग्रस्तांना त्वरीत मदत , रक्तदान , वाहतूक नियम तसेच कोरोना लसीकरण व कोरोना पासून बचाव करण्याचे उपाय अशा विविध विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे . नंतर शहरातील मुख्य केंद्रबिंदू म्हणून समजल्या जाणाऱ्या क्रांतीचौक येथे एक सोहळा आयोजित केला आहे. नंतर बाईक रँली ने औरंगाबाद शहर परिसरात जनजागृती होईल .
या मध्ये हेल्प रायडर्स् चे समन्वयक यांच्या सोबत शहर वाहतूक पोलिस , 94.3 माय FM , सिग्मा हाँस्पिटल ग्रुप हे देखील सहभागी आहेत . शहरातील नागरिकांनी या सामाजिक चळवळीत व जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे असे आव्हान मुख्य समन्वयक प्रशांत कनोजिया , मुख्य समन्वयक संदीप कुलकर्णी यांनी केले आहे .