
दैनिक चालु वार्ता
शिरपूर प्रतिनिधी
महेंद्र ढिवरे
२८ मार्च २०२१ रोजी भ्रष्टाचा राची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी निवेदन दिले. मात्र प्रशासनाने लॉकडाऊनाचे कारण पुढे करत उत्तर दिले नाही.
धुळे :- धुळे महापालिकेत साडेपाच कोटींचा भ्रष्टाचार झाला असून प्रशासनाने केवळ पत्रोपत्री करत हा विषय टोलवला आहे. त्यामुळे या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी धुळ्यातील ७० वर्षीय वृध्दाने आजपासून उपोषण सुरु केले आहे. धुळे शहरातील चितोड मार्गावरील वाघ नगर येथील पंचवृक्ष महादेव मंदिर येथे राहणार्या भगवान बळीराम वाघ (वय ७०) यांनी हे उपोषण सुरू केले आहे. याबद्दल माहिती देताना भगवान वाघ म्हणाले की, धुळे महापालिकेत साडेपाच कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून ४८ कामे बेकायदेशिररित्या झाली आहेत.
२८ मार्च २०२१ रोजी भ्रष्टाचाराची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले. मात्र प्रशासनाने लॉकडाऊनचे कारण पुढे करत उत्तर दिले नाही. त्यानंतर माहिती अधिकाराअतंर्गत चौकशी केली. त्यामुळे सर्वांची पत्रे यायला सुरुवात झाली. त्या पत्रांमध्ये मी रेंगाळत गेलो. मी ज्या अधिकार्यांना चौकशीसाठी निवेदन दिले होते. त्यांनी मला उत्तरच दिले नाही.
शहर पोलिसांना देखील निवेदन दिले होते. तत्कालीन आयुक्त अजीज शेख यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे आज (२४ जानेवारी) पासून भगवान वाघ हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या सोबत दीपकुमार साळवे हे दखील उपसिव्थत होते. जीवाचे काही बरे वाईट झाले तर शासन जबाबदार राहील असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे