
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी जळकोट
हानमंत गित्ते
जळकोट :- जळकोट येथील नगरपंचायत मध्ये निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा महात्मा फुले शिक्षण संस्था येथे सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा फुले शिक्षण संस्था येथे, जळकोट मधील निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा सत्कार ठेवण्यात आला होता.तत्पूर्वी संस्थेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी सर्वांनी कोरोणा संबंधीचे सर्व नियम पाळून मा. सचिव साहेब श्रीहरी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला.
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला जळकोट मधील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, मन्मथअप्पा किड, नामवाड संग्राम ,धुळशेट्ठे मीनाक्षी, पाटील धोंडुतात्या.,वर्षा सिद्धेश्वरे, शिवलीग धुळशेट्ठे, मंगनाळे लक्ष्मीबाई, संदीप डांगे,गबाळे गोपाळकृष्ण, लाटवडे बाबुमिया, अश्विनी गवळे सुरेखा, डांगे विनायक, धुळशेट्ठे संगीता,कांबळे प्रभावती, देशमुख सुमनबाई, देवशेट्ठे रेखा आदी नगरसेवक उपस्थित होते, तसेच संस्थेचे संस्थाचालक चंदन श्रीहरी पाटील, संस्थेतील सर्व कर्मचारी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अर्जुन आगलावे (मामा), व्यंकटरावजी पवार आदी उपस्थित होते. मा. चंदन पाटील यांच्या हस्ते सर्व नगरसेवकांचा शाल, श्रीफळ व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.